नाशिक- सेंट्रल ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालयात दुसरा अंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्षेत्रीय कार्यालय नाशिक आणि सातपूर शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी योगाचे प्रात्याक्षिक केले. योग प्रशिक्षक निलेश तांबे यांनी योगावर व्याख्यान देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले.याप्रसंगी क्षेत्रीय प्रबंधक एच.के.नाईक यांनी योगाचे धडे घेतले. सोबतच उप क्षेत्रीय प्रबंधक टी.एस.हरिलाल आणि सातपूर शाखेचे प्रबंधक के. संतोष यांनी ही दररोज योग करण्याचा संकल्प केला. (वा.प्र.)---
सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे योग दिन साजरा
By admin | Updated: June 23, 2016 00:07 IST