आकोटात सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
आकोट : येथील श्री दुर्गा माता मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी सामूहिकरीत्या मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.
आकोटात सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा
आकोट : येथील श्री दुर्गा माता मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी सामूहिकरीत्या मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. मुलां-मुलींवर चांगले संस्कार घडावेत, या उद्देशाने येथील युवा सेवा संघ आणि श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रोजेक्टरद्वारा मातृ-पितृ पूजन कसे आणि का करावे, याबाबत माहिती देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश पांडे यांनी भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी समिती व युवा संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सोहळ्याला बहुसंख्येने पालक व बालक-बालिका उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)फोटो : १३एकेटीपी०७.जेपीजी