शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 08:36 IST

पाकिस्तानकडून रविवारी ( 30 जुलै ) शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

श्रीनगर, दि. 31 - पाकिस्तानकडून रविवारी ( 30 जुलै ) शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. राजौरीचे उपायुक्त शाहिद इकबाल चौधरी यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील नौशेरा परिसरात गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जून महिन्यात पाकिस्तानकडून 23 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानच्या बॅट टीमचा हल्ल्यात आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये तीन जवान शहीद झाले होते तर चार स्थानिकांचा मृत्यू झाला होता व 12 जण जखमी झाले होते.

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मादरम्यान, 30 जुलैला जवानांनी पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचा घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरूच आहेत. पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील चकमकीत सुरक्षा जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. रविवारी सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू होती.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील एका घरात तळ ठोकून बसले होते. भारतीय लष्कराला माहिती मिळताच त्यांनी दहशतवाद्यांना घेरले व चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून नियंत्रण रेषेचं उल्लघंन आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय जवानदेखील पाकिस्तानच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देत आहेत.  

तर मागील सहा महिन्यात सुरक्षा दलांनी 92 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पाहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादीविरोधी कारवाईत या व वर्षात खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेत होते.

लष्कराला मोठं यश जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108 तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचे श्रेय लष्कर, केंद्रीय दल, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचे आहे. 

कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्याआधी संपूर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसे ठार करता येईल याकडेही लक्ष दिले जाते".