शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

CDSCO चाचणी... तुम्ही रोज जी औषधे घेता त्यातील ४८ ठरली नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:31 IST

विशेष म्हणजे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरलेले नमुने हे नियमित वापरातील औषधांचे आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) ताज्या तपासणीत नियमित वापरातील ४८ औषधांचे नमुने निर्धारित पातळीपेक्षा (मानक) कमी गुणवत्तेचे असल्याचे आढळून आले आहे. मार्चमध्ये विविध उत्पादन युनिटमधून घेतलेल्या औषधांच्या १४९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यांतील १४४९ नमुने तर गुणवत्ता चाचणीत यशस्वी ठरले; मात्र ४८ नमुने (३ टक्के) निर्धारित गुणवत्तेचे नसल्याचे आढळून  आले. 

विशेष म्हणजे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरलेले नमुने हे नियमित वापरातील औषधांचे आहेत. यात अँटासिड (ॲसिडिटीसाठी वापरले जाणारे औषध), ॲण्टिबायोटिक्स व रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांचा समावेश आहे, असे या राष्ट्रीय औषध नियामक संस्थेने सांगितले. फेब्रुवारीत सीडीएससीओच्या चाचणीत १२५१ पैकी ५९ (५ टक्के) नमुने कमी गुणवत्तेचे आढळले  होते.

नेमकी कोणती औषधे?मल्टी-व्हिटॅमिन औषधांपासून ते एचआयव्हीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषध रिटोनावीरचाही या यादीत समावेश आहे. गॅबापेंटिन, हायपरटेन्शनचे औषध तेलमिसार्टन, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड व मेटफॉर्मिन, आयर्न व फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १२, अमोक्सीसिलिन, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी ३ गोळ्यांसह मेस्वाक टूथपेस्टचेही यात नाव आहे.

औषधे चाचणीत का अयशस्वी झाली ?औषध बनवण्यास वापरलेली सामग्री प्रमाणित पातळीवर नसणे, त्यांतील घटकांच्या प्रमाणात गडबड असणे व चुकीचे लेबलिंग, आदी कारणांमुळे हे नमुने चाचणीत अयशस्वी ठरले.

टॅग्स :medicinesऔषधं