गुजरातमधील अहमदाबादमध्ये लुटण्याच्या इराद्याने एका दागिन्यांच्या दुकानात शिरलेल्या महिलेचा प्रयत्न पूर्णपणे फसला. ग्राहक बनून आलेल्या या महिलेने दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला, पण तिचा प्लॅन फसला आणि संतप्त दुकानदाराने तिला २५ सेकंदांत जवजवळ २० वेळा चापट मारली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास अहमदाबादमधील रानीप भाजी मार्केटजवळील एका सोन्या-चांदीच्या दुकानात घडली. चेहऱ्यावर दुपट्टा बांधून आलेल्या महिलेने सुरुवातीला ग्राहक बनून दुकानात प्रवेश केला. काही क्षणातच, लुटण्याच्या उद्देशाने महिलेने अचानक दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला. पण मिरची पूड दुकानदाराच्या डोळ्यात गेली नाही. महिलेचा हेतू लक्षात येताच संतापलेल्या दुकानदाराने महिलेला २५ सेकंदांच्या आत जवळजवळ २० वेळा चापट मारली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, दुकानदार लगेच उठला, काउंटरवरून उडी मारली आणि तिला चापट मारतच दुकानाबाहेर ओढत नेले आणि रस्त्यावरही तिला वारंवार चापट मारत राहिला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदाराने या घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या महिलेचा शोध सुरू आहे.
Web Summary : In Ahmedabad, a woman's robbery attempt at a jewelry store failed when the owner retaliated. After trying to throw chili powder in his eyes, the jeweler slapped her repeatedly. The incident was caught on CCTV, and police are searching for the woman.
Web Summary : अहमदाबाद में एक महिला का गहने की दुकान में लूट का प्रयास विफल हो गया जब मालिक ने जवाबी कार्रवाई की। आंखों में मिर्च पाउडर फेंकने की कोशिश के बाद, जौहरी ने उसे बार-बार थप्पड़ मारे। घटना सीसीटीवी में कैद हो गई, और पुलिस महिला की तलाश कर रही है।