शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इस्रो बनवणार भारतीय रेल्वेला हायटेक, प्रत्येक डब्यात लागणार सीसीटीव्ही- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:48 IST

गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय.बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे.बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी इस्रोचीही मदत घेणार असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. ते दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी इस्रोचीही मदत घेणार असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.रेल्वेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी आरपीएफचे जवान व तसेच सर्व टीटीई यांना गणवेश परिधान करणं सक्तीचं करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या दृष्टीनं सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी इस्रो, रेल टेक आणि भारतीय रेल्वे एकत्रितरीत्या काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्रीपदावरून पायउतार करत ते पद पीयूष गोयल यांना बहाल करण्यात आलं होतं. मोदी सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पीयूष गोयल यांनी पाच कलमी योजना आखली होती. एका वर्षाच्या आत मानवरहीत फाटक बंद करा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्या बैठकीत दिले होते.मानवरहीत रेल्वे फाटक बंद करण्यासाठी तीन वर्षांचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. मानवरहीत रेल्वे फाटक आणि रुळावरून डबे घसरणे, यामुळे रेल्वे अपघात होतात. हे रोखण्यासाठी रेल्वेत ‘स्पीड’, ‘स्किल’ आणि ‘स्केल’ या धर्तीवर कामे करण्याचे आदेश पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या अपघातांची रेल्वे बोर्डातील अधिका-यांनी रेल्वेमंत्र्यांना माहिती दिली होती. मानवरहीत रेल्वे फाटकावर २०१६-१७ या कालावधीत ३४ टक्के अपघात झाले आहेत. नादुरुस्त रूळामुळे एक्स्प्रेस बोगी रुळावरून घसरते, अशी कारणे बोर्डाने दिली. तर रेल्वेत सुरक्षितता हीच प्राथमिकता असून, यात तडजोड करू नये, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्या.तर रेल्वे अपघातांच्या मालिकांमुळेच सुरेश प्रभू यांना राजीनामा द्यावा लागला होता.  रेल्वे अपघातामुळे राजीमाना देणारे सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वे मंत्री नव्हते. यापूर्वी सुद्धा रेल्वेमंत्र्यांचा ‘अपघाता’ने घात केला आहे. यंदा (२०१६-१७) रेल्वे अपघातात २३८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे बोगी रुळावरुन घसरल्यामुळे सर्वाधिक १९३ जण मरणमार्गावर स्वार झाले. उपलब्ध आकडेवारीनूसार गत १७ वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २०१५-१६ साली १२२ जणांचा मृत्यू झाला.यात बोगी घसरल्यामुळे ३६ जणांचा समावेश आहे. देशातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यास सक्षम नाही. हे या आकडेवारीवरुन हे सत्य पुन्हा एकदा ठळक होत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे