शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आधी गोळ्या झाडल्या, नंतर ग्रेनेड फेकले... CISF बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 14:41 IST

CISF bus on terrorist attack: सीआयएसएफच्या बसला कशाप्रकारे लक्ष्य करण्यात आले, याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. 

जम्मू-काश्मीर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) बसवर शुक्रवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) एसपी पाटील शहीद झाले. तर बसमध्ये बसलेले अन्य दोघे जखमी झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, सीआयएसएफच्या बसला कशाप्रकारे लक्ष्य करण्यात आले, याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. 

2 मिनिटे आणि 2 सेकंदांचा हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. या व्हिडिओची प्रत्येक फ्रेम तुम्हाला हादरवेल. हा व्हिडीओ चढ्ढा कॅम्प भागातील आहे. रस्त्यावर दिवे लागले आहेत. विजेचे खांब आणि काही तारा दिसत आहेत. वेळ पहाटेची आहे. रस्त्यावर शांतता आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये सुमारे 30 सेकंदांनंतर चौकात एक दुचाकी दिसत आहे. तेवढ्यात बस येण्याचा आवाज येतो. मात्र काही क्षणातच मोठा आवाज झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर ग्रेनेडने हल्ला केला. क्षणार्धात शांततेचे स्फोटात रूपांतर झाले. आगीच्या ठिणग्या आणि धुराचे लोट दिसू लागले.

हल्ल्यानंतर दहशतवादी घरात लपलेसकाळी सव्वा चार वाजता जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ ड्युटीवर जात असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. तसेच, या कारवाईत सीआयएसएफचा एक एएसआय शहीद झाला. यासोबतच चार जवानही जखमी झाले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीआयएसएफ बसवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी परिसरातील मोहम्मद अन्वर यांच्या घरात लपले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 24 एप्रिलला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट असल्याचा संशय सुरक्षा दलांना होता. त्यानुसार, गुरुवारी संध्याकाळपासून जम्मू पोलिसांनी लष्कर आणि निमलष्करी दलांसह शहरातील अनेक भागात शोधमोहीम राबवली. ही शोध मोहीम शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती आणि या कारवाईदरम्यान सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार सुरू केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcctvसीसीटीव्हीterroristदहशतवादी