नवी दिल्लीः सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन(CBSE)नं 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत दोन मुली टॉपर ठरल्या आहेत. त्या दोघींनी परीक्षेत 99.8 टक्के गुण मिळवून पहिलं स्थान पटकावलं आहे. त्या दोघींना परीक्षेत 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. या विजयावर टॉपर हंसिका आनंदी तर आहेच, परंतु तिला 1 गुण कमी पडल्याचं दुःखसुद्धा आहे. हंसिकानं समाजशास्त्र विषयात 12वीत पहिलं स्थान मिळवलं. तिला इंग्रजीत 99 गुण मिळाले आहेत. तर ऊर्वरित चार विषयां(पॉलिटिकल सायन्स, संगीत गायन, इतिहास आणि सायकॉलॉजी)मध्ये तिला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. हंसिकानं 12वीच्या परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावलेला नव्हता. तिनं स्वतःच अभ्यास करण्यावर जोर दिला होता.हंसिका म्हणाली, यश मिळवण्याला कोणतीही वेळ आणि मर्यादा नसते. परीक्षेच्या तयारीसाठी मी पूर्णतः पुस्तकं आणि शाळेत शिकवल्या गेलेल्या नोट्सची मदत घेतली होती. मी कोणतंही कोचिंग क्लास लावलेला नव्हता. तसेच ऑनलाइनपद्धतीनंही अभ्यास केला नव्हता. माझा अभ्यास मी NCERTच्या पुस्तकांवरून केला आहे. अभ्यासासाठी त्यावरच माझा भर होता. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होते, असंही ती सांगते. हंसिकाचं फेसबुक प्रोफाइल आहे. पण तरीही टॉपर सांगते, जर मी ऑनलाइन चॅट करणं आणि गेम खेळण्यासाठी जो वेळ वाया घालवला, तोच वेळ मी अभ्यासासाठी दिला असता तर इंग्रजीमध्ये 1 गुण कमी मिळाला नसता. 17 वर्षांच्या हंसिकानं स्वतःचं 12वीपर्यंतचं शिक्षण डीपीएस गाझियाबादमधून केलं आहे. तिला सायकोलॉजीमध्ये ऑनर्स करायचं आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या लेडी श्री राम कॉलेजमधून मला सायकोलॉजी ऑनर्स शिकायचं आहे.
...तर 500 पैकी 500 गुण पक्के होते; CBSE टॉपर हंसिकाने सांगितलं 1 मार्क गेला कसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 13:47 IST