मल्ल्यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी सीबीआय सहा देशांना विनंती पत्र पाठविणार
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
मल्ल्यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी सीबीआय सहा देशांना विनंती पत्र पाठविणार
मल्ल्यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी सीबीआय सहा देशांना विनंती पत्र पाठविणार
मल्ल्यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी सीबीआय सहा देशांना विनंती पत्र पाठविणारनबिन सिन्हा : नवी दिल्लीमद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीची माहिती मागविण्यासाठी सहा देशांना राजनैतिक माध्यमातून विनंती पत्र (लेटर रोगेटरी) पाठविण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. याशिवाय मल्ल्यांविरुद्धचे वित्तीय घोटाळे आणि त्यांनी कर्जाची रक्कम अन्यत्र वळविल्याच्या संदर्भातील औपचारिक तक्रारी पाठविण्याची सूचनाही सीबीआयतर्फे सार्वजनिक बँकांना करण्यात येणार आहे.सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन, फ्रान्स, मॉरिशस, अमेरिका, हाँगकाँग आणि दक्षिण आफ्रिका या देशांना येत्या दोन दिवसांत मल्ल्यांच्या गुंतवणुकीविषयीची माहिती मागविणारे हे विनंती पत्र पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. तथापि मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्यानंतर आता त्यांची अन्य देशांतील असलेली संपत्ती जप्त करण्याची विनंती मात्र या देशांना केली जाणार नाही.मल्ल्यांनी आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९०० कोटींच्या कर्जाच्या तपासाला सीबीआयने गती दिली आहे. या संदर्भात फौजदारी गुन्हा आधीच दाखल करण्यात आला आहे आणि मल्ल्यांसह बँकेच्या अधिकार्यांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान कर्ज घोटाळा आणि रक्कम अन्य देशात वळविण्याच्या संदर्भात औपचारिक तक्रारी दाखल करण्याची सूचना सीबीआयतर्फे भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांना केली जाणार आहे. अद्याप एकाही बँकेने अशी तक्रार सीबीआयकडे पाठविलेली नाही. आयडीबीआय कर्ज घोटाळ्याबाबत सीबीआयने स्वत:हून गुन्हा दाखल केला होता.