शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:21 IST

ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे.

नवी दिल्ली- ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. राजनाथ सिंह निवेदन देत असताना तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सीबीआय तोता है, तृणमूलच्या खासदारांची घोषणाबाजी देत सभागृह दणाणून सोडला. त्यादरम्यान राजनाथ सिंह यांनी भाषण दिलं आहे. कायद्याच्या संस्थांना अटकाव करणं देशहितासाठी योग्य नाही. संस्थांना काम करण्यापासून रोखल्यास व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील. केंद्रानं नेहमीच राज्यांच्या अधिकारांचा सन्मान केला आहे.पोलीस हे राज्यांतर्गत येतात. राज्यांनीही केंद्र सरकारच्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. कालची घटना ही संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवण्यासारखी आहे. राज्यपालांशी माझं बोलणं झालं असून, मी त्यांच्याकडून एक रिपोर्ट मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना काम करण्यापासून रोखू नये, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.लोकसभेत राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, कोलकात्यात सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यापासून रोखण्यात आलं. अशी घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना राजकीय संरक्षण दिलं जातंय.सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे. त्यामुळेच सीबीआयला आयुक्तांच्या घरी जावे लागले. या घोटाळ्यात नावाजलेल्या आणि राजकीय लोकांचा समावेश आहे. राजनाथ सिंह भाषण करत असतानाच तृणमूलच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. तृणमूल खासदारांच्या गदारोळानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह