शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस, देश सोडून जाण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 15:07 IST

सीबीआयने ही नोटीस जारी केली असून कार्ती चिदंबरम यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे

नवी दिल्ली, दि. 4 - माजी केंद्रीय मत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सीबीआयने ही नोटीस जारी केली असून कार्ती चिदंबरम यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान कार्ती चिंदबरम यांनी सीबाआयच्या नोटीसला विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

जेव्हा एखादी संशयित व्यक्ती तपासाला बगल देत देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते, अशावेळी तपास यंत्रणा सरकारला लूकआऊट नोटीस जारी करण्याची विनंती करते. कार्ती चिदंबरम यांनी देशाबाहेर दौरा करण्याआधी त्याची माहिती सीबीआय तसंच सक्तवसुली संचलनालयाला द्यावी असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. तपास यंत्रणांनी संमती दिली तरच कार्ती चिदंबरम देशाबाहेर प्रवास करु शकतात. 

कार्ती चिदंबरम यांनी मात्र आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसून, राजकीय हेतून आरोप होत असल्याचा दावा केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) मनी लाँडरिंगप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल केला होता. या दोघांवर विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. 

कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. पी चिदंबरम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले होते.