शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, पणजीत दोन जागा वगळता अन्यत्र आंदोलनांना बंदी, आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 19:55 IST

पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तरी फक्त कांपाल परेड मैदान आणि आझाद मैदान अशा दोनच ठिकाणी धरणे, निषेध मोर्चासारखे आंदोलनात्मक उपक्रम करावेत, अन्यत्र केल्यास ते आंदोलन बेकायदा मानून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करणारा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी गुरुवारी जारी केला आहे.

पणजी : गोव्यात आता सेंट झेवियर महोत्सव आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे (इफ्फी)सोहळे होणार आहेत. त्यामुळे पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तरी फक्त कांपाल परेड मैदान आणि आझाद मैदान अशा दोनच ठिकाणी धरणे, निषेध मोर्चासारखे आंदोलनात्मक उपक्रम करावेत, अन्यत्र केल्यास ते आंदोलन बेकायदा मानून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करणारा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी गुरुवारी जारी केला आहे.येत्या दि. 20 पासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्ताने पणजीत युद्धपातळीवर सगळी तयारी सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेसह सरकारच्या विविध यंत्रणा या कामामध्ये गुंतल्या आहेत. दुस-याबाजूने पणजीपासून जवळच असलेल्या जुनेगोवे येथे जगप्रसिद्ध सेंट झेवियर फेस्त साजरे होणार आहे. त्यानिमित्ताने नोव्हेंना म्हणजेच ख्रिस्ती धर्मींय बांधवांच्या प्रार्थनांना येत्या दि. 23 पासून आरंभ होणार आहे. जगभरातून भाविक या फेस्तासाठी येतात. डिसेंबरमध्ये तर फेस्तानिमित्त लाखोंची गर्दी होत असते. शिवाय त्यावेळी नाताळाचीही धूम असते. राज्यात पर्यटनाचाही मोसम सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात वाहने पणजीत फिरतात. अशावेळी पणजीत कुठेही जर मोर्चे, धरणो आणि अन्य आंदोलने झाली तर, पणजीतील वाहतुकीचा फज्जा उडेल तसेच अन्य समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन पणजी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील दोन जागा आंदोलनांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. विविध निमसरकारी संस्था (एनजीओ) आणि अन्य संघटनांनी जिल्हाधिका:यांच्या या आदेशाची नोंद घ्यावी असे सरकारला अपेक्षित आहे.पणजीत एरव्ही कदंब बस स्थानकाकडील सर्कल, बंदर कप्तान खात्याकडील जेटी, मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानाबाहेर, वाहतूक खाते असलेल्या जुन्ता हाऊसकडे व अन्य काही ठिकाणी आंदोलने होत असतात. अलिकडेच बांधकाम खात्याच्या मजुर सोसायटीच्या कर्मचा-यांचा मोर्चा आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आला होता. तसेच पॅरा शिक्षिकांनी भाजपच्या येथील कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते. आता अशा ठिकाणी आंदोलने करता येणार नाहीत. कांपाल परेड मैदान व आझाद मैदानावर आंदोलन करण्यापूर्वी संबंधितांनी पूर्वपरवानगी घ्यावी हे जिल्हाधिका:यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सरकारने आझाद मैदानाचे नुकतेच पूर्ण नूतनीकरण केले आहे.

टॅग्स :goaगोवा