शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जातिवाचक शिवीगाळ; 'ॲट्रॉसिटी'त गुन्हा नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय, दुरुपयोगाबद्दल चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 07:04 IST

Atrocity News: अपमान करण्याचा हेतू असल्याशिवाय केवळ जातिवाचक शिवीगाळ करणे हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा ठरणार नाही, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे.

- डॉ. खुशालचंद बाहेतीबेंगळूरू : अपमान करण्याचा हेतू असल्याशिवाय केवळ जातिवाचक शिवीगाळ करणे हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा ठरणार नाही, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. यापूर्वी ओडिशा हायकोर्टानेही असाच निकाल दिला असून, केरळ हायकोर्टाने या कायद्याचा  दुरुपयोग होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

जून २०२० मध्ये शैलेश कुमार आणि एका व्यक्तीमध्ये क्रिकेट सामन्यावरून हाणामारी झाली. शैलेश कुमारविरुद्ध तपासात जातिवाचक शिवीगाळ केल्याचे पुरावे आले. त्यानंतर ॲट्रॉसिटी कायदा लावून आरोपपत्र दाखल झाले.

हा खटला रद्द करण्यासाठी शैलेश कुमार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने याचिका अंशत: मान्य करत ॲट्रॉसिटी कायद्याचे आरोप रद्द केले. भांडण क्रिकेटवरून झाले. अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे मत हायकोर्टाने व्यक्त केले.

केरळ हायकोर्टाचे न्या. ए. बदरुद्दीन यांनी डिसेंबर २०२२ मध्ये एका जामीन अर्जावर निर्णय देताना, अनेक निरपराध व्यक्ती ॲट्रॉसिटी कायद्याच्या खोट्या गुन्ह्याचे बळी ठरत आहेत, हे धक्कादायक व मनाला चटका लावणारे आहे, असे निरीक्षण नोंदवले.

ॲट्रॉसिटी कायद्यासाठी सार्वजनिक दृष्टिपथात अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचा हेतुपूर्वक अपमान अनिवार्य आहे. हेतू या तरतुदीचा आत्मा आहे. केवळ जातीचे नाव घेतल्याने ॲट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा होत नाही.    - न्या. एम. नागप्रसन्ना,     कर्नाटक उच्च न्यायालय 

अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचा अपमान करण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा हेतू नसेल तर जातीचे नाव घेऊन शिवीगाळ करणे हा ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरणार नाही.    - न्या. राधाकृष्ण पट्टनाईक     ओडिशा उच्च न्यायालय     (डिसेंबर २०२२) 

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाCourtन्यायालय