शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

प्रियकराच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप

By admin | Updated: March 24, 2016 23:37 IST

कोल्हापूर : पत्नीच्या प्रियकराचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे तिसरे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. खंबायते यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी (दि. २३) ठोठावली. अशोककुमार दसरूराम सलाम (वय ३०, रा. मणेर मळा, उचगाव, ता. करवीर, मूळ रा. देवरी, ता. कोरर, जि. काकीर, छत्तीसगड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासले.

कोल्हापूर : पत्नीच्या प्रियकराचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे तिसरे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. खंबायते यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी (दि. २३) ठोठावली. अशोककुमार दसरूराम सलाम (वय ३०, रा. मणेर मळा, उचगाव, ता. करवीर, मूळ रा. देवरी, ता. कोरर, जि. काकीर, छत्तीसगड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, उचगाव येथील कच्छी यांच्या स्क्रॅप गोडावूनमध्ये अशोककुमार सलाम हा कामास होता. त्याच ठिकाणी एक महिला कामास होती. त्यातून अशोककुमार व त्या महिलेचे प्रेमसंबंध जुळले व त्यांनी विवाह केला. याच ठिकाणी विजय राजाराम पवार (२६, रा. उचगाव) हा दिवाणजी कामाला होता. त्यातून तिघांची मैत्री झाली. त्यानंतर अशोककुमारची पत्नी व विजय पवार याचे प्रेमसंबंध जुळले. हा प्रकार अशोककुमारला समजला. याचा राग त्याच्या मनात होता.३१ ऑगस्ट २००९ रोजी अशोककुमार हा दोन साथीदारांच्या मदतीने विजय पवारला घेऊन उचगाव येथील ओम साई पेट्रोल पंपाच्या पिछाडीस आला. त्याठिकाणी विजय पवारचा टॉवेलने गळा आवळून या तिघांनी खून केला व त्याचा मृतदेह खड्ड्यामध्ये पुरला. दरम्यान, खुनानंतर अशोककुमार हा छत्तीसगडमधील आपल्या गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गांधीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन साहाय्यक निरीक्षक आर. व्ही. कोतमिरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी पकडले. पण अशोककुमार सलाम हा मी खून केला नसल्याचे खोटे बोलू लागला. परंतु, पोलिसांनी चौकसपणे व कसून तपास केला असता त्याने खुनाची कबुली दिली.