रमाकांत पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: December 28, 2015 00:06 IST
जळगाव: डॉ.रमाकांत पाटील यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रविवारी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता त्यांच्या निवासस्थानासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. मेंदूला मार लागल्यामुळे ते जागेवरच बेशुध्द पडले होते. रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली होती.शनिवारी दुपारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली होती. प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर रविवारी अपघाताची नोंद करण्यात आली.