शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 08:31 IST

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे.

जोधपूर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात भारताने खडतर विजय मिळविला होता. उंच डोंगर, पहाडांवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करत कब्जा केला होता. यामुळे त्यांना टिपणे भारतीय सैन्याला कठीण जात होते. तसेच उंचावरून खाली असलेले भारतीय जवान पाकिस्तानी सैन्यासाठी सोपे लक्ष्य बनत होते. अशावेळी जवानांच्या मदतीला बहाद्दूर योद्धा धावून आला. त्याने पाकिस्तानी सैन्याने ताबा घेतलेल्या जागांपेक्षा उंच जात एकेका सैनिकाला टिपले होते. आज हा योद्धा आपला निरोप घेतोय. 

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. आज जोधपूरच्या हवाई तळावरून मिग-27 च्या स्क्वॉड्रनची सात विमाने आकाशात झेपावर देशवासियांचा कायमचा निरोप घेणार आहेत. संरक्षण खात्याचे प्रवक्ते संबित घोष यांनी सांगितले की, 27 डिसेंबरला सात मिग-27 विमाने जोधपूर हवाई तळावरून शेवटचे उड्डाण करणार आहेत. याच दिवशी ही विमाने सेवेतून बाहेर होणार आहे. यानंतर ही विमाने पुन्हा कधीही उड्डाण करणार नाहीत. ही मिग-27 ची शेवटची स्क्वॉड्रन आहे. 

भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण मिग-27 ही विमानांची तुकडी केवळ भारताचीच शेवटची नसून जगातील शेवटची तुकडी असणार आहे. कारण आता कोणताही देश या विमानांचा वापर करत नाही. या विमानांचे पुढे काय करणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे घोष यांनी सांगितले. 

सेवेतून कमी केल्या गेलेल्या विमानांची शस्त्रास्त्रे आणि विमाने प्रदर्शनासाठी ठेवली जातात किंवा डेपोला दिली जातात. तर बऱ्य़ाचदा मित्र देशांना दिली जातात. जोधपूर एअरबेसवर दोन स्क्वॉड्रन होते. यापैकी एक याच वर्षी सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे. आज उड्डाण करणारी विमाने हवेत झेपावून पुन्हा जमिनीवर उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मिग-27 चे सर्व पायलट हजर राहणार आहेत. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन