शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लवादांवर विशिष्ट गटांचे नियंत्रण नसेल याची काळजी घ्यावी लागेल, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 12:22 IST

आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिकेत वसलेले, विकसनशील, कमी विकसित किंवा अविकसित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांसाठी ग्लोबल साऊथ ही संज्ञा वापरली जाते. 

नवी दिल्ली : केवळ लवाद संस्था स्थापन करणे पुरेसे नाही तर ही तंटा निवारण केंद्र एका विशिष्ट गटाद्वारे नियंत्रित केली जाणार नाहीत याचीही खबरदारी आम्हाला घ्यावी लागेल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. ते ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालयात बोलत होते. भारतासारख्या देशांनी व्यावसायिक लवादाला प्रोत्साहन देण्याची तसेच लवादाला संस्थात्मक रूप देण्याची वेळ आली आहे. जे ‘ग्लोबल साऊथ’ ची लवाद परंपरा पुढे नेतील. आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिकेत वसलेले, विकसनशील, कमी विकसित किंवा अविकसित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांसाठी ग्लोबल साऊथ ही संज्ञा वापरली जाते. 

भारतातील न्यायालयांवर खटल्यांचा जास्त भार आहे, उच्च न्यायालयांनी २०२३ मध्ये २१.५ लाख खटले निकाली काढले व जिल्हा न्यायालयांनी २०२३ मध्ये ४.४७ कोटी खटले निकाली काढले. भारतातील लोक आपल्या न्यायप्रणालीवर किती विश्वास ठेवतात हे या आकडेवारीवरून दिसून येते. कोणताही खटला छोटा-मोठा नसतो या सूत्रावर आपली न्यायव्यवस्था काम करते. न्यायालयात जाणाऱ्या प्रत्येक पीडित व्यक्तीला दिलासा मिळण्याचा अधिकार आहे. भारतात न्यायालये आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु, लवाद ही तंटा सोडविण्याची अधिकाधिक स्वीकारार्ह पद्धत बनत असल्याने तोडग्यासाठी प्रत्येक प्रकरण न्यायालयात आणण्याची गरज नक्कीच नाही. अलीकडच्या काळात भारतात आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र स्थापन झाली आहेत आणि त्यामधील खटल्यांचा ओघ हळूहळू वाढला आहे. पण केवळ संस्था स्थापन करणे पुरेसे नाही, तर या संस्था विशिष्ट गटांद्वारे नियंत्रित केल्या जाणार नाहीत याचीही खबरदारी  घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. (वृतसंस्था) 

चंद्रचूड यांना स्वत:चे आसन देऊन गौरवब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष लॉर्ड रीड यांनी भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांना स्वत:चे आसन देऊन गौरविले. न्या. चंद्रचूड यांनी युनायटेड किंगडमच्या सर्वोच्च न्यायालयात ‘द लॉ अँड प्रॅक्टिस ऑफ कमर्शियल आर्बिट्रेशन : शेअर्ड अंडरस्टँडिंग अँड डेव्हलपमेंट इन द यूके अँड इंडिया’ या विषयावर व्याख्यान दिले. ब्रिटनच्या घटनापीठ अध्यक्षांच्या न्यायदान कक्षात हा कार्यक्रम झाला. तेव्हा रीड यांनी त्यांना स्वत:चे आसन दिले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड