शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

खटारा बस हद्दपार होणार, बॉडी कोडनुसारच तयार होतील गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:05 IST

देशभरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जुनाट बस वाहतूकीतून बाद करण्याकरिता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशभरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जुनाट बस वाहतूकीतून बाद करण्याकरिता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.नव्या मानकानूसार बनविलेल्या बस यापुढे प्रवासी वाहतूकीसाठी मंजूरी देण्यात येईल असा नियम सरकारने बनविला असून त्याची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. हा नियम पुढील वर्षीच्या एक एप्रिलपासून लागू होईल. भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी हे पाऊल उचलले.काय आहे नवीन मानके?बसमध्ये वापरण्यात येणाºया प्रत्येक सुट्या भागाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.बसचे दरवाजे, खिडक्या यांचा आकार, बसच्या बाहेरील व आतील दिवे कशा प्रकारचे व कुठे लावलेले असावेत, आरसे, हँडल, फिटिंग याबाबतही सूचना केल्या आहेत.अग्निप्रतिबंधक साधने कोणती व कुठे बसवावीत, प्रवाशांकरिता असलेली उद्घोषणा व्यवस्था, आपत्कालीन मार्ग कसा असावा याबद्दलही विश्लेषण करण्यात आले.प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाचीप्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसच्या सांगाड्याची बारकाईने तपासणी केली जाईल. भरधाव वेगात असलेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यानंतर प्रवाशांना किती धोका निर्माण होऊ शकतो या गोष्टीचेही परीक्षण करण्यात येणार आहे. बसची एखादे वाहन किंवा अन्य गोष्टीशी टक्कर झाल्यास प्रवाशांचे कमीतकमी नुकसान व्हावे यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.सुखद प्रवास करता यावा म्हणून आसनांचा आकार, दोन आसनांमधील अंतर तसेच ही आसने बनविण्यासाठी कोणती सामग्री वापरावी याबाबतच्या सूचनाही आहेत.