शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

कार रेसर अश्विन आणि त्याच्या पत्नीचा आगीमध्ये होरपळून मृत्यू

By admin | Updated: March 18, 2017 11:21 IST

प्रसिद्ध कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीताचा शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 18 - प्रसिद्ध कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीताचा शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिल्यानंतर लगेच पेट घेतला
 
अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अश्विन गाडी चालवत होता. निवेदीता डॉक्टर होती ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली गाडी पाहिल्यानंतर रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी लगेच चेन्नई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन अधिका-यांनाच आगीवर नियंत्रण मिळवायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.
 
पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतदेह इतके खराब अवस्थेत होते की, पोलिसांना लगेच अश्विन सुंदरला ओळखता आले नाही.  गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोरुर जवळच्या अल्पाक्कम येथे अश्विन आणि त्याची पत्नी राहत होते. एमआरसी नगर येथे राहणा-या मित्राच्या घरी ते गेले होते. तिथून परतत असताना ही दुर्देवी घटना घडली.