शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द

By admin | Updated: June 30, 2017 17:28 IST

सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे. एक अधिकारी म्हणाला, सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे नाथू लाचा रस्ता खुला करण्यात आला नाही. कैलास मानसरोवर यात्रा रद्द केल्यानंतर जवळपास 800 भाविक निराश झाले आहेत. मात्र उत्तराखंड मार्गे यात्रा सुरूच राहील. भारतीय लष्करानं चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा उलटा कांगावा चीननं सुरू केला आहे. चीननं सिक्कीममध्ये नियंत्रण रेषेच्या वादाला भारत जबाबदार असल्याचा आरोप केला होता. चीनच्या पीपल्स लिब्ररेशन आर्मीने सुद्धा भारतीय जवानांसोबत धक्काबुक्की केली होती. तर बुधवारपासून नाथू ला खिंडीतून कैलास मानसरोवरला जाणा-या यात्रेकरूंना नाथू ला जवळ थांबवण्यात आलं आहे. 2015मध्ये चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी नाथू ला खिंडीतील मार्ग खुला केला होता. हा मार्ग तिबेटमार्गे नाथू ला खिंडीतून जातो. जोपर्यंत नियंत्रण रेषेवरून भारतीय जवान मागे हटत नाहीत, तोपर्यंत नाथू ला खिंडीचा मार्ग खुला करणार नसल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं सीमापार गेलेल्या जवानांना तात्काळ परत बोलावावं, असं आवाहनही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी केलं होतं. हिमालयातील सिक्कीम नाथू ला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू या मार्गानं जाऊ शकत होते. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, 2013 साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब आणि नादुरुस्त झाला होता. (सीमेवरून लष्कर हटवा अन्यथा मानसरोवरचा रस्ता बंद, चीनची भारताला धमकी)(चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!)उत्तराखंड आणि नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. नाथू ला खिंडीतून जाणाऱ्या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 1500 किमीच्या मार्गापर्यंत बसने जाता येत होते. हा नवा मार्ग सुरू करण्यासाठी तिबेटी लोकांनी बरीच तयारी केली होती. या 1 हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. 18 तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात. ही संपूर्ण यात्रा 23 दिवसांची असून 19 दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणशी 1.80 लाख रुपये येतो.