शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सीएए रद्द करा; केरळच्या विधानसभेत ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:41 IST

ठराव केलेले देशातील पहिले राज्य; माकपच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि काँग्रेस केंद्र सरकारविरुद्ध एकत्र

थिरुवनंतपुरम : वादग्रस्त नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) रद्द करा, अशी मागणी करणारा ठराव केरळ विधानसभेने मंगळवारी संमत केला. असा ठराव केलेले केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्ही सीएएची अंमलबजावणी करणार नसल्याची घोषणा केली आहे, तर माकपची सत्ता असलेल्या केरळने सीएएला थेट कायद्याच्या माध्यमातून विरोध केला आहे.माकपच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी आणि विरोधी काँग्रेस पक्ष आपापसातील राजकीय मतभेद दूर सारून पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात सीएएच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. केरळ विधानसभेच्या विशेष अधिवेशनात दोन आघाड्यांच्या सदस्यांनी एकमुखाने प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.१४० सदस्यांच्या सभागृहात भाजपचा एकमेव सदस्य असून, त्याने प्रस्तावाला विरोध केला. हा ठराव बेकायदा आणि घटनाविरोधी असल्याचे भाजप सदस्य म्हणाला. सीएए म्हणजे भारताला धार्मिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न असल्याची टीका ठरावात करण्यात आली होती.सीएएविरोधात भारतीयांचे निवेदनदुबई : वादग्रस्त दुरुस्तीमुळे नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) चिंता व्यक्त करून संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय नागरिकांच्या एका गटाने अबुधाबीतील भारतीय दूतावासाला निवेदन देऊन या कायद्यामुळे धार्मिक भेदभाव केला जाईल, असा दावा केला.सुमारे ३० भारतीयांनी दूतावासातील अधिकाऱ्यांची रविवारी भेट घेऊन सीएएला विरोध केला, असे गल्फ न्यूजने वृत्त दिले.दुरुस्त झालेल्या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील मुस्लिम वगळता इतर धर्मीयांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन दिले गेल्यामुळे समाजात फूट निर्माण होते, असे या लोकांचे म्हणणे होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकKeralaकेरळ