शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या पंतप्रधानांना अपमानास्पद वागणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:13 IST

त्रिदेऊ यांनी सोमवारी पत्नी व तीन मुलांसह अहमदाबादमधील साबरमती आश्रम व अक्षरधाम मंदिराला भेट दिली. तेथेही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही आणि राज्याचा एकही ज्येष्ठ मंत्री त्यांच्या स्वागताला वा सोबत नव्हता

त्रिदेऊ यांनी सोमवारी पत्नी व तीन मुलांसह अहमदाबादमधील साबरमती आश्रम व अक्षरधाम मंदिराला भेट दिली. तेथेही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही आणि राज्याचा एकही ज्येष्ठ मंत्री त्यांच्या स्वागताला वा सोबत नव्हता, असे सांगण्यात येते. त्रिदेऊ यांनी अहमदाबादमधील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.नवी दिल्ली : भारताच्या दौºयावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ यांना भारत सरकारकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्रिदेऊ आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर गेले नाहीत. त्यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्याला तेथे पाठवले. ते ताजमहाल पाहायला गेले, तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांनी राजशिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत करणे अपेक्षित होते. पण ते अनुपस्थित राहिले.कॅनडातील ‘टोरँटो सन’ वृत्तपत्रात कॅँडिस माल्कम या लेखिकेने लेख लिहून हे मुद्दे उपस्थित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू भारत दौºयावर आले होते तेव्हा मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.पण या वेळी मात्र मोदी यांनी टाळले, असे त्यांनी लिहिले आहे.मात्र, सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी त्रिदेऊ यांचा अवमान करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. त्रिदेऊ यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचाराचा जो सर्वमान्य संकेत आहे तो पाळण्यात आला होता. उलट दौºयाच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांना भेटण्याचे व चर्चा करण्याचे त्यांनी ठरविले याबद्दल भारताने आश्चर्य व्यक्त केले आहे.कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ २१ फेब्रुवारी रोजी सुवर्णमंदिरात जाणार आहेत. तेथे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्रिदेऊ यांची पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग अमृतसर येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतील असे सूत्रांनी सांगितले. त्रिदेऊ यांची भेट घेण्यास आपण उत्सुक आहोत असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची सोमवारी टिष्ट्वट करुन जाहीर केले होते. भारत दौºयाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात या दोघांची भेट ठरलेली नाही असे कॅनडाच्या अधिकाºयांनी म्हटले होते. पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली.कॅनडाचे संरक्षणमंत्री व खलिस्तान समर्थक असलेले हरजितसिंग हे गेल्या वर्षी भारत दौºयावर आले असता त्यांची भेट घेण्यास अमरजितसिंग यांनी नकार दिला होता. ही घटना लक्षात ठेवून त्रिदेऊ अमरिंदरसिंग यांना भारत दौºयात भेटणार नाहीत असे म्हटले जात होते.