शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

ट्रुडोंना मोदींनी चांगलाच धडा शिकविला? तीन दिवसांपासून भारतात, तिकडे कॅनडातून अपमानावर टीका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:22 IST

रविवारी कॅनडाचे मोठे वृत्तपत्र टोरंटो सनने धिस वे आऊट या शीर्षकाखाली पहिल्याच पानावर एक फोटो छापला आहे.

विमानात बिघाड झाल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे गेल्या तीन दिवसांपासून भारतात अडकले आहेत. आज त्यांचे विमान दुरुस्त झाल्याने ते आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ कॅनडाला निघणार आहेत. परंतू, या जी २० परिषदेमुळे कॅनडात मात्र मोठे वादळ आले आहे. ट्रुडो यांना जी २० परिषेदेदरम्यान भारतात मिळालेल्या वागणुकीवरून प्रसरमाध्यमांसह विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे.

खलिस्तानी मुद्द्यावरून भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यातूनच कॅनडाच्या पंतप्रधानांना अशी वागणूक मिळल्याचा सूर परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. रविवारी कॅनडाचे मोठे वृत्तपत्र टोरंटो सनने धिस वे आऊट या शीर्षकाखाली पहिल्याच पानावर एक फोटो छापला आहे. राजघाटावर मोदींनी पारंपरिक पद्धतीने हस्तांदोलन केल्यावर दुसऱ्या हाताने मोदींनी ट्रुडोंना इशारा केला, तोच हा फोटो आहे. याचवेळी ट्रुडो यांना भारतातील जी २० मध्ये त्यांचे मित्र खूप कमी आहेत, याचा भास झाला असेल, असे या वृत्तपत्रात म्हटले आहे. 

द सन वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार जी20 परिषदेच्या आदल्या रात्री भारताने आयोजित केलेल्या डिनरला ट्रुडो उपस्थित नव्हते. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने असे का घडले याचे स्पष्टीकरण दिले नाहीय. स्वच्छ, हरित उर्जा आणण्याच्या प्रगतीसाठी भागीदारी असलेल्या ग्लोबल बायोफ्यूअल्स अलायन्सच्या लॉन्चला ट्रूडो देखील उपस्थित राहिले नाहीत.

कॅनडातील विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी हे अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांना उर्वरित जगाकडून वारंवार अपमानित केलेले कोणालाही पहावणारे नाही, असे ते म्हणाले. ट्रूडो यांनी विनंती करूनही भारताकडून द्विपक्षीय बैठक घेण्याची परवानगी मिळाली नाही, मात्र फक्त मोदींसोबत चर्चा करण्याची संधी दिली गेली. रॉयटर्स आणि ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार या चर्चेदरम्यान मोदींकडून त्यांना टीकात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. 

कॅनडाचे पंतप्रधान भारतात आल्यानंतर इतर नेत्यांप्रमाणे मोदींनी 'स्वागत नोट' पोस्ट केली नाही. मोदी यांनी ट्रुडो यांच्यासोबत झालेल्या भेटीत कठोर भूमिका घेतली आणि कॅनडात भारतविरोधी कारवाया सुरू राहणे ही 'तीव्र चिंतेची' बाब असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. तर ट्रुडो यांनी कॅनडाच्या कारभारात भारताचा हस्तक्षेप हा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले. कॅनडाने वारंवार खलिस्तानी दहशतवाद्यांना भारत विरोधी आंदोलनांसाठी त्यांची भूमी वापरू देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताने खलिस्तानींविरोधात आक्रमक निती अवलंबलेली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. यातूनच ट्रुडो यांना जी २० परिषदेत मोदींकडून महत्व दिले गेले नसल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. 

टॅग्स :Justin Trudeauजस्टीन ट्रुडोNarendra Modiनरेंद्र मोदीG20 Summitजी-२० शिखर परिषद