शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

असा वाढू शकतो तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड?

By admin | Updated: February 8, 2017 07:52 IST

3G किंवा 4G डेटा पॅक टाकून सुद्धा इंटरनेटला स्पीड मिळत नाही यामुळे अनेकांचा संताप अनावर होतो.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 08 -मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या देशात ३० कोटींपेक्षाही अधिक आहे. त्यात दर महिन्याला कोट्यवधी युजर्सची भरही पडत आहे. मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढण्याचा वेग मोठा आहे. 3G किंवा 4G डेटा पॅक टाकून सुद्धा इंटरनेटला स्पीड मिळत नाही यामुळे अनेकांचा संताप अनावर होतो. काही वेळेस आपण टेलिकॉम कंपनीला दोष देत असतो पण इंटरनेटचा स्पीड आपल्या काही चुकीच्या गोष्टीमुळे सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.ब्राउझर : तुमच्या मोबाईलच्या दृष्टीने कोणते ब्राऊझिंग अ‍ॅप चांगले आहे ते निवडावे. ब्राऊझिंग अ‍ॅप निवडताना त्याची साईझ, विश्वासहार्यता, डेटा किती खातो अशा गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गुगल क्रोम हा अँड्रॉइडसाठी सर्वोत्तम ब्राउझर्स पैकी एक आहे. हा ब्राउझर तुमचे पासवर्ड, तसेच बुकमार्क्स लक्षात ठेवतो.Cache क्लिअर करा : जर तुमचा फोन स्लो किंवा इंटरनेटचा स्पीड कमी झाला असेल तर मोबाईल व ब्राउझर मधील कॅशे (Cache) डिलिट करा. वेळोवेळी कॅशे क्लिअर केला, तर फोन आणि इंटरनेट व्यवस्थित चालते.अनावश्यक अ‍ॅप्स काढा : अ‍ॅप आवडलेकी आपण ते डाउनलोड करतो किंवा शेअरिंगने घेतो. त्याचा वापर होवो अथवा न होवो आपण त्याला अनइन्स्टॉल करत नाही. त्यामुळे ते अ‍ॅप मोबाईल मधील जागा खाते शिवाय बॅकग्राउंडलाही सुरू राहते. त्यामुळे फोन आणि इंटरनेट स्लो होते. म्हणूनच अनावश्यक अ‍ॅप काढून टाका.इमेजेस डिसेबल करा : इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी मोबाईलचा ब्राउझर ह्यटेक्स्ट ओन्ली मोड वर ठेवा. फोनच्या किंवा ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये तो पर्याय उपलब्ध असतो. टेक्स्ट ओन्ली मोड सुरू केला, की ब्राउझरमध्ये फोटो लोड होणार नाहीत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड काही प्रमाणात वाढण्यास मदत होते.