शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

ब्रेड वा पावामुळे होऊ शकतो कर्करोग ? सीएसईच्या अहवालात दावा

By admin | Updated: May 24, 2016 13:56 IST

लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला ब्रेड किंवा पाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतो, त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असा दावा सीएसईने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - झणझणीत मिसळ, चीजबर्स्ट पिझ्झा, टोस्ट सँडविच.. या सगळ्या फास्ट फूड कॅटॅगरीतील पदार्शातील कॉमन घटक म्हणजे ब्रेड.. आजच्या पिढीतील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला हा ब्रेड किंवा पाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतो. ब्रेड खाल्ल्यामुले कॅन्सर होऊ शकतो असा दावा 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट' (सीएसई) या संस्थेच्या अहवालात करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र सीएसईचा हा अहवाल आम्ही अद्याप पाहिलेला नाही, अशी माहिती 'ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' तर्फे देण्यात आली आहे. 
सँडविच ब्रेड, पाव, बन, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सीएसईने आपल्या अहवालात केला आहे. त्यासाठी संस्थेच्या प्रदूषण मापन प्रयोगशाळेने दिल्लीतील विविध बेकरी व फास्ट फूट आऊटलेटमधील अनेक पॅकबंद पाव उत्पादनांची तपासणी केली असता त्यापैकी ७५ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. जे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये ८४ टक्के नमुन्यात पोटॅशियम ब्रोमेट व आयोडेट ही रसायने सापडली आहेत. पोटॅशियम ब्रोमेट तसेच पोटॅशियम लोडेट हे दोन्ही केमिकल कॅन्सरजन्य आहेत. या दोन्ही केमिकल्सचा वापर पीठ फुगवण्यासाठी केला जातो. पीठ फुगवल्यानंतर त्यात हे केमिकल उरत नाही असा दावा केला जात होता. पण तपासणी करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये त्यांचे घातक प्रमाण आढळल्याचा दावा संस्थेने केला आहे. 
 
३८ कंपन्यांच्या नमुन्यांची करण्यात आली तपासणी
देशात विकल्या जाणा-या ब्रेड, बन्स तसेच रेडी टू इट बर्गर व पिझ्झाच्या ३८ प्रसिद्ध ब्रॅंडमधील नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ८४ टक्के नमुने सदोष आढळून आले. अनेक पॅकबंद पावांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडेट यासारखी घातक रसायने सापडली आहेत. या रसायनांवर अनेक देशात बंदी असून ते आरोग्यास हानिकारक आहेत असे सीएसईने नमूद केले आहे. ब्रिटानिया, हार्वेस्ट गोल्ड, केएफसी, पिझ्झाहट, डॉमिनोज, सबवे, मॅकडोनाल्ड व स्लाइस ऑफ इटली यांच्याही उत्पादनांची तपासणी करण्यात आली असून ती सदोष निघाली आहेत. मात्र ब्रिटानिया, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड व सबवे यांनी आपण अशी कोणीतीही रसायने वापरल्याचा नाकारले आहे.
 
प्रकरण गंभीर, होणार चौकशी - आरोग्यमंत्री
दरम्यान सीएसईच्या या अहवालानंतर नागरिकांमध्ये एकच खळब माजली आहे. मात्र आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी जनतेला घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले असून 'आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्यासंबधी चौकशीचे आदेश दिले आहेत' असे स्पष्ट केले आहे. 
 
दरम्यान अन्न व औषधे प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी याप्रकरणी एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. ' सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंटच्या संचालकांनी विविध ब्रँडच्या ३८ ब्रेड्सची तपासणी करून त्यापैकी ३२ नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट, १.१५ ते २२.५४ पीपीएम पर्यंत आढळल्याचे काल प्रसिद्ध केले होते. 
कायद्यानुसार ब्रेडचा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अन्न पदार्थाची मानके व ऑडिटिव्ह नियम २०११मध्ये २. ४. १५ (२) नुसार ब्रेडसाठी मानके देण्यात आली आहेत. त्यानुसार अल्कोहोलिक अॅसिटिडी, अॅश इनसॉल्युबलचे प्रमाण दिले असून बाह्यघटक, किडे इ. नसावेत. 
अॅपेन्डीक्स ए चे टेबल १ मध्ये ब्रेड व बिस्कीटांसाठी अॅडीटिव्हचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार ब्रेड इम्प्रुव्हर म्हणून पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट ५० पीपीएमपर्यंत वापरण्याची परवानगी आहे. तथापि काही बाहेरील देशांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट वापरास परवानगी असून काही देशांनी त्यावर बंदी घातली आहे. पण भारतात आत्तापर्यंत अशी बंदी घालण्यात आलेली नाही. 
कायद्यानुसार पोटॅशियम ब्रोमेट वा आयोडेटचे प्रमाण ५० पीपीएमपर्यंत वापरण्यासाठी परवानगी असून, त्यास परवानगी देणे अथवा न देणे ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारित येते'  असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.