शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो का? शाळेने आरोप नाकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 13:04 IST

एका चार वर्षाच्या मुलाने चार वर्षाच्याच मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे.

नवी दिल्ली : एका चार वर्षाच्या मुलाने चार वर्षाच्याच मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे. ईशान्य दिल्लीतील ज्या प्रतिष्ठित खासगी शाळेत ही घटना घडली आहे ते शाळा प्रशासन या घटनेनं हादरलं आहे. पण एखादा चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं असून पोलीस अधिकारी देखील या घटनेमुळे संभ्रमात आहेत. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. अशी घटना घडली आहे की नाही याबाबत संभ्रम अशल्याचं अधिका-यांचं म्हणणं आहे. जर अशी घटना खरंच घडली असेल तर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे, कारण अशा प्रकरणात इतक्या छोट्या मुलावर लावण्यासाठी आयपीसीमध्ये कोणतंही कलम नाही. अशाप्रकारची घटना घडणं अशक्य असल्याचं शाळेचे वकील एनबी जोशी म्हणाले. मुलांचं वॉशरूम मुलींच्या वॉशरूमपासून बरंच दूर आहे. मुलगा मुलींच्या वॉशरूममध्या जाण्याचा फ्रश्नच येत नाही. सीसीटीव्ही फूटेजमध्येही मुलगा वॉशरूममध्ये जाताना दिसत नाही असं जोशी म्हणाले.  पोलिसपण हैराण -  आरोपी मुलगा केवळ चार वर्षांचा आहे. आयपीसीच्या सेक्शन 82 नुसार, 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाद्वारे केलेलं कोणतंही कृत्य गुन्हा मानला जात नाही. यानुसार, मुलाला बाल सुधारगृहात देखील पाठवला येऊ शकत नाही. लैंगिंक शोषण सिद्ध झाल्यावरच शाळेवर कारवाई करता येईल. तज्ञ देखील हैराण- एखादा 4- 5 वर्षाचा मुलगा असं काही करू शकतो हे वैद्यकीय दृष्ट्या शक्य नाही,  शारिरिक किंवा मानसिक दृष्ट्या इतक्या कमी वयात मुलं प्रगल्भ नसतात, असं दिल्लीतील AIIMS चे  मनोचिकित्सक डॉक्टर नंद कुमार म्हणाले.   मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला खरा, पण आरोपीचे एवढे लहान वय बघता या प्रकरणाची कायदेशीर हाताळणी नेमकी कशी करायची, याविषयी ते संभ्रमात पडले आहेत. आम्ही हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत असून कायदेशीर सल्ला घेत आहोत, असे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.पोलिसांनी या विद्यार्थ्याला खरंच अटक केली तर केवळ ‘पॉक्सो’ कायद्याखालचाच नव्हे तर बलात्काराच्या गुन्ह्यातील देशातील तो सर्वात लहान वयाचा आरोपी ठरेल. दंड प्रक्रिया संहितेत सात वर्षांपर्यंतच्या मुलांना गुन्ह्यांच्या बाबतीत विशेष संरक्षण आहे. या प्रकरणात ते कसे व कितपत लागू होते याची पोलीस तपासणी करीत आहेत.मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार गेल्या शुक्रवारी शाळेत घडला. आरोपी विद्यार्थ्याने आधी वर्गात आणि नंतर वॉशरूममध्ये त्याच्यासोबत शिकणाºया या मुलीची पॅन्ट काढून तिच्या गुप्तांगात टोक केलेली शिसपेन्सिल व बोट घुसविले, असा आरोप आहे.तरतूद भेदभावाची-या प्रकरणाचा विचार करता फौजदारी कायद्यांमधील तरतुदी पुरुष आणि स्त्री यांना भेदभावाची वागणूक देणारी आहे, असे जाणवते. लज्जा हे स्त्रीचे जन्मजात व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे मुलगी वयाने कितीही लहान असली तरी तिचा विनयभंग होतो, असे कायदा मानतो. मुलाच्या बाबतीत मात्र हे लागू नाही. एवढ्या लहान मुलाने ही कृती केली खरी पण ती करताना त्याच्या मनात लैंगिक भावना नव्हती, असा बचाव कायद्यापुढे टिकू शकत नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंगNew Delhiनवी दिल्ली