शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CM केजरीवाल अडचणीत; सरकारी बंगल्याच्या नुतणीकरणावर झालेल्या खर्चाचे CAG ऑडिट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 16:29 IST

अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या शासकीय बंगल्याचे नूतनीकरण केले होते. या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाचे कॅगमार्फत ऑडीक केले जाणार आहे. उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या शिफारशीवरुन गृह मंत्रालयाने कॅगच्या विशेष ऑडिटला मान्यता दिली आहे. उपराज्यपाल सचिवालयाने 24 मे 2023 रोजी गृह मंत्रालयाला पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाबाबत गंभीर आर्थिक अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स, दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणातील आर्थिक अनियमिततेचे विशेष ऑडिट करतील. यासंदर्भात केंद्राने कॅगला केलेल्या विनंतीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 24 मे रोजी, एलजी कार्यालयाने केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याच्या नूतनीकरणाशी संबंधित खर्चाचे कॅगद्वारे विशेष ऑडिट करण्याची शिफारस केली होती. 

45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली 45 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा भाजपने यापूर्वी केला होता. एवढी मोठी रक्कम खर्च केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणीही भाजपने केली होती.

CVC ने उपराज्यपालांना अहवाल सादर केलादिल्ली सरकारच्या दक्षता विभागाच्या (केंद्रीय दक्षता आयोग) अहवालात अरविंद केजरीवाल यांच्या घरात 52.71 कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. केजरीवाल यांच्या घराच्या दुरुस्तीच्या नावाखाली 52.71 कोटी रुपयांच्या खर्चाचा अहवाल सीव्हीसीने गेल्या महिन्यात नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या कार्यालयाला सादर केला होता. तेव्हापासून या प्रकरणाने आणखीनच तापले.

'आप'ने दिले स्पष्टीकरण याप्रकरणी आम आदमी पक्षाकने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. आपचे खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा म्हणाले होते की, सीएम केजरीवाल राहतात ते घर 1942 मध्ये बांधण्यात आले होते. जुने घर असल्यामुळे घरात अनेक ठिकाणी पाणी गळायचे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) त्याचे ऑडिट करण्यात आले आणि त्यानंतरच नुतनीकरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली