शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइलला बंदी!

By admin | Updated: October 23, 2016 04:40 IST

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर शत्रू देशांकडून, विशेषत: पाकिस्तान व चीनकडून, सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता, यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोबाइल फोन आणायलाच

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर शत्रू देशांकडून, विशेषत: पाकिस्तान व चीनकडून, सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता, यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोबाइल फोन आणायलाच पंतप्रधान कार्यालयाने बंदी घातली आहे. पाकिस्तान व चीनकडून सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. अगदी बँकांनाही हा इशारा देण्यात आला आहे. त्याचमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या मुद्यांवर घेण्यात आलेले निर्णय व विविध धोरणांसंबंधीची अतिसंवेदनशील वा कोणतीही माहिती बाहेर फुटू नये, यासाठी उद्देशाने हा खबरदारीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोनच्या बंदीसंदर्भात अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्रीय सचिवालयाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कोणत्याही बैठकीत स्मार्ट फोन, मोबाइल फोन वापरण्यावर परवानगी नाकारण्यात आली असून, यासंबंधी प्रत्येक मंत्र्यांना, त्यांच्या खासगी सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची योग्य ती माहिती द्यावी, असे केंद्रीय सचिवालयाने या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. सर्जिकल स्ट्राइक्समुळे बिथरलेला पाकिस्तान आता स्मार्ट फोन, मोबाइल फोनसारख्या यंत्रामधील डेटा हॅक करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. यासाठी दक्षता म्हणून अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे मोबाइल फोन आॅफिसमधील कॅम्प्युटर आणि लॅपटॉपला जोडू नयेत, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय या भागांतही स्मार्टफोनवर वापरावर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कार्यालयांत जाणाऱ्या व्यक्तींच्या स्मार्ट व मोबाइल फोनवरही बंधने घातली जाणे अपेक्षित आहे.