शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी; पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:29 IST

जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटदेखील सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी दिली. यासोबतच कॅबिनेटनं जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटदेखील सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकार संसदेच्या येत्या अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयक सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जुन्याच अध्यादेशाच रुपांतर विधेयकात करण्यात येईल, असंदेखील त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक 2019 ला मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं आरक्षण लागू करण्यासाठी 1954 मधील राष्ट्रपतींच्या आदेशात बदल केला आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसोबतच आंतरराष्ट्रीय सीमेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनादेखील आरक्षण मिळेल. याआधी केवळ नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांनाच आरक्षणाचा लाभ मिळत होता.31 मे रोजी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज संपन्न झाली. यामध्ये सरकारच्या लघू आणि दीर्घकालीन अजेंड्यावर चर्चा झाली. काल पंतप्रधान मोदींनी सरकारच्या सर्व सचिवांची बैठक घेतली होती. त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर