शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest: आंदोलनात सहभाग घेतल्यानं जर्मन विद्यार्थ्याला सोडावा लागला भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:12 IST

आयआयटी मद्रासमध्ये शिकणारा विद्यार्थी मायदेशी परतला

चेन्‍नई: सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केल्याबद्दल जर्मनीच्या विद्यार्थ्याला देश सोडावं लागल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयआयटी मद्रासमध्ये शिकणारा जेकब लिंडेंथल काल संध्याकाळी जर्मनीला परतला. जेकब आयआयटी मद्रासमध्ये भौतिकशास्ज्ञात एमएसस्सी करत होता. त्याची एक सेमिस्टर शिल्लक होती. मे २०२० मध्ये तो मायदेशी परतणार होता. मात्र सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्यानं त्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या आठवड्यात चेन्नईत विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं केलं. त्यामध्ये जेकबनं सहभाग घेतला. मोदी सरकारनं संसदेत मंजूर केलेला नवा कायदा नाझींकडून ज्यूंवर केलेल्या अत्याचारांची आठवण करुन देणारा असल्याचे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात जेकब नव्या कायद्याविरोधात आंदोलन करताना दिसत होता. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्यामुळेच आपल्याला भारत सोडावा लागत असल्याचं जेकबनं माध्यमांना सांगितलं. मला सगळ्या गोष्टी तोंडी सांगण्यात आल्या, असं म्हणत आपल्याला कागदोपत्री कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत याकडे त्यानं लक्ष वेधलं. एखादा परदेशी नागरिक राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यास ते व्हिसा नियमांचं उल्लंघन ठरतं असं इमिग्रेशन विभागातील सूत्रांनी सांगितलं.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक