शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest : तू हिंदू आहेस ना? मग तुझे मित्र मुस्लिम कसे?; पोलिसांचा आंदोलनकर्त्याला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 15:57 IST

CAA Protest : जामिनावर तुरुंगाबाहेर झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे गंभीर आरोप

लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करताना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशीदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्यानं केला आहे. तू हिंदू आहेस. मग मुस्लिमांसोबत तुझी मैत्री कशी, अशा प्रकारचे प्रश्न पोलिसांनी चौकशीदरम्यान विचारल्याचा आरोप रॉबिन वर्मा यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करत असताना वर्मांना २० डिसेंबर रोजी अटक झाली. त्यांना गेल्याच आठवड्यात जामीन मंजूर झाला. पेशानं शिक्षक असलेले रॉबिन वर्मा सामाजिक कार्यकर्तेदेखील आहेत. पोलिसांनी चौकशीदरम्यान अतिशय आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचे आरोप वर्मांनी केले. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप वर्मांनी 'द हिंदू' दैनिकाशी बोलताना केला. याशिवाय आपल्या पत्नी आणि लहान मुलीबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषा वापरल्याचा दावाही वर्मांनी केला. पोलिसांनी माझा फोन तपासला. अजूनही तो त्यांच्याच ताब्यात आहे. पोलिसांनी माझ्या फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर पाहिले आणि त्यातील मुस्लिम व्यक्तींच्या नावांवरुन मला  अपमानित केलं, असं वर्मा यांनी सांगितलं. 'माझ्या एका (मुस्लिम) विद्यार्थ्यानं मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी त्या विद्यार्थ्याचा मेसेज पाहून तू त्याला कसा ओळखतोस? तुझ्या मोबाईलमध्ये मुस्लिम व्यक्तींचे नंबर कसे काय? तू त्यांच्याशी मैत्री कशी ठेवतोस? तू त्यांच्यासोबत का जातोस?' असा प्रश्नांचा भडिमार पोलिसांनी केल्याचा आरोप वर्मांनी केला. पोलिसांनी पत्नी आणि लहान मुलीबद्दल अतिशय वाईट शब्दांत शेरेबाजी केल्याचा दावादेखील त्यांनी केला. 'तिला कुठेतरी नेऊन बसवू. तिला धंदा करायला लावू,' असं पोलीस चौकशीदरम्यान म्हणाले. माझ्या दोन वर्षांच्या मुलीबद्दलही पोलिसांनी हीच भाषा वापरली. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी पोलिसांनी दिली, असं वर्मा यांनी सांगितलं.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक