शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CAA: राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यास नकार; गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीचा दीक्षांत सोहळ्यावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 07:58 IST

अनेक विद्यार्थी दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहणार

पुद्दुचेरी: पुद्दुचेरी विद्यापीठाच्या सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थिनीनं दीक्षांत सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या निषेधार्थ कार्थिका बी. कुरूप ही विद्यार्थिनी दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी कार्थिकाचा गौरव होणार होता. एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक मीडिया या विषयात कार्थिकाला सुवर्ण पदक घोषित झालं आहे. संसदेनं संमत केलेला सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा निषेध म्हणून दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय कार्थितानं घेतला आहे. शनिवारी तिनं तिचा हा निर्णय व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर अवघ्या काही तासांतच तो व्हायरल झाला. गेल्या वर्षी मास्टर्स पूर्ण केलेल्या कार्थिकाला सुवर्ण पदक जाहीर झालेलं आहे. 'राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मानवतेच्या आणि घटनेच्या विरोधात असलेल्या कायद्याचा निषेध करण्याचा मला हक्क आहे. मी लोकशाहीच्या मार्गानं माझा निषेध नोंदवत आहे', अशा शब्दांत कार्थिकानं तिची भूमिका स्पष्ट केली.विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची दखल न घेणाऱ्या सरकारबद्दल कार्थिकानं नाराजी व्यक्त केली. 'देशभरात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची बाजू ऐकून घेण्याची तयारी सरकारनं दाखवलेली नाही. जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेणार नाही, तोपर्यंत मी पदवी स्वीकारणार नाही,' अशी ठाम भूमिका कार्थिकानं घेतली आहे. 

दीक्षांत सोहळ्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन पुद्दुचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या ए. एस. अरुण कुमारनंदेखील दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचा आणि त्या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडू पाहणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं कुमारनं सांगितलं.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीRamnath Kovindरामनाथ कोविंद