शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protests: शेकडो आंदोलकांनी पोलिसांना घेरलं; तिरंगा फडकावून काही तरुणांनी वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 12:03 IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणही लागलं. या हिंसक आंदोलनांमुळे कर्नाटकातल्या मंगळुरूत दोन, लखनऊमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला.  गुजरातमधलाही असाच एक व्हिडीओ समोर आला. ज्यात आंदोलकांनी पोलिसांना घेरल्याचं पाहायला मिळतंय. जमावानं पोलिसांना घेरून त्यांच्यावर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले.अहमदाबादमधल्या शाह-ए-आलम भागातही जमावानं पोलिसांना घेरल्यानंतर त्यांना मारहाणही केली. ज्यात डीसीपी, एसीपी निरीक्षकांसह 19 पोलीस कर्मचारी जखमी झाले. एका पोलीस कर्मचाऱ्याला जमावानं जबरदस्त मारहाण केली. त्याच दरम्यान काही तरुणांनी भारताचा तिरंगा उंचावत त्या पोलिसांचा जीव वाचवला. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती. त्यावेळी तरुणांनी एक सुरक्षा कवच तयार केलं आणि पोलिसांना त्या जमावाच्या तावडीतून सोडवलं. विशेष म्हणजे ते तरुणसुद्धा नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रदर्शन करत होते. हिंसक झालेल्या जमावाचा व्हिडीओ गुजरातमधील अहमदाबादमधून समोर आला आहे.  तसेच अहमदाबादमधल्या शाह-ए-आलम भागातल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवलं असून, आतापर्यंत 32 जणांना ताब्यात घेतलं आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. लवकरच इतरांनाही ताब्यात घेऊ, असं अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक