शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

CAA Protests: धरपकड करण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हटले; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 09:03 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांना हिंसक वळण लागलेलं आहे.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांना हिंसक वळण लागलेलं आहे. आंदोलनाने गुरुवारी रौद्ररूप धारण केल्याने दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. हे आंदोलन पसरू नये, म्हणून सरकारने दिल्लीतील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केल्या. त्याच दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केली.अशा तणावाच्या वातावरणात सायंकाळी उशिरा जंतर-मंतरवर आंदोलन करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. पण तिकडे पोलीस गेले असता वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पोलिसांना पाहताच आंदोलकांनी 'जन गण मन' हे राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. राष्ट्रगीत ऐकताच कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलकांना हातही लावला नाही. सर्व पोलिसांनी सावधगिरी बाळगून आंदोलकांसोबत राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय संस्कृतीचं पुन्हा एकदा पोलिसांनी दर्शन घडवलं आहे. जमावबंदीचा आदेश झुगारून अनेक विद्यार्थी जंतरमंतरवर जमा झाले होते. विद्यार्थ्यांनी तोंडाला पट्ट्या लावून ‘सेव्ह कान्स्टिट्युशन’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेतले होते. हजारो विद्यार्थी सकाळपासून लाल किल्ला परिसरात जमा झाले होते. परंतु पोलिसांनी तिथे लगेचच जमावबंदी लागू केली आणि विद्यार्थी नेता उमर खालिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्वच विद्यार्थ्यांना पकडण्याचे सत्र सुरू केले. तेथून सुमारे 20 गाड्या भरून विद्यार्थ्यांना नेण्यात आले. गेल्या रविवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. जामिया, जेएनयू व दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांनी लाल किला परिसरात शांततेने आंदोलनाचे आवाहन केले होते. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक