शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही सुरू होणार सी-प्लेन; दीड महिन्यात ठरणार धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:22 IST

केंद्र सरकार लवकरच नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्याचा मुहूर्त घोषित करणार असून, सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्याचा मुहूर्त घोषित करणार असून, सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सी-प्लेनबाबत पुढील ४५ दिवसांत मार्गदर्शकतत्त्वे आणि नियम निश्चित करण्याचे ठरविले आहे. यातहत काही निवडक राज्यांतही कमी अंतरासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणाही केली जाऊ शकते.नागरी उड्डयन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नागरी उड्डयन सचिव आर. एन. चौबे हे येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यत्वे नवी मुंबई विमानतळाबाबत ते चर्चा करतील. तीन वर्षांत नवी मुंबई विमानतळ सुरू करण्याचा नागरी उड्डयन मंत्रालयाचा इरादा आहे. त्यादृष्टीने विमानतळ उभारणीच्या कामासाठी प्राथमिक निविदाही चालू वर्षअखेर जारी करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत विमानतळ उभारण्याचे काम सुरू करता येईल. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य जरुरी असल्याने राज्य सरकारसोबत चर्चा करून काम सुरू करण्याचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याचा नागरी उड्डयन मंत्रालयाचा बेत आहे.>काही निवडक शहरात सुरू करणार सी-प्लेन सेवाअन्य एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सी-प्लेनबाबत ४५ दिवसांत धोरण ठरविणार आहे. एकेरी इंजिनच्या ‘सी-प्लेन’ला परवागनी द्यावी का? या मुद्यांवर दोन मतप्रवाह आहेत. एक गटाची यासंदर्भात नकारात्मक भूमिका आहे. दुहेरी इंजिनच्या सी-प्लेनलाच परवानगी द्यावी, असे या गटाचे म्हणणे आहे.दुसºया गटाचे असे म्हणणे आहे की, कमी अंतरासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याने एकेरी किंवा दुहेरी इंजिनबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. तथापि, एकेरी इंजिनच्या सी-प्लेनसाठी दोन वैमानिकांची अट असावी. जेणेकरून कोणतीही तांत्रिक समस्या निर्माण होणार नाही.तथापि, याबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे प्रस्तावित धोरणातून स्पष्ट होईल. महाराष्टÑ, गुजरात तसेच दक्षिण भारतातील काही शहरांत सी-प्लेन सेवा सुरू केली जाऊ शकते. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस