शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 13:17 IST

अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: लोकसभेसाेबतच १३ राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणाही निवडणूक आयोगाने केली. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिहार, हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, त्रिपुरा, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या नऊ राज्यांतील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेची तर, हिमाचल प्रदेशातील ६, गुजरातमधील ५, उत्तर प्रदेशातील ४ आणि पश्चिम बंगालमधील दोन जागांची पोटनिवडणूक आयोगाने घोषित केली आहे. 

अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक

  • अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान होईल.
  • या मतदारसंघातून सहा वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले. 
  • त्यामुळे ही जागा रिक्त आहे. येथे  २६ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. हा मतदारसंघ १९९५ पासून भाजपचा गड राहिला आहे. 
  • गोवर्धन शर्मा यांनी प्रथम १९९५ मध्ये येथून विजय मिळविला होता. त्यानंतर सलग सहा वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

चार दिवसांपूर्वी राजीनामा तेथे पोटनिवडणूक

विशेष म्हणजे १२ मार्चला हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाचा, तसेच १३ मार्चला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही यामध्ये समावेश आहे.

फेब्रुवारीत हिमाचल प्रदेशातील सहा आमदार अपात्र तेथेही पोटनिवडणूक

  • हिमाचल प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात राज्यसभा निवडणूक झाली हाेती. 
  • त्यावेळी पक्षादेश डावलून विरोधी उमेदवाराला मतदान केल्याप्रकरणी अपात्र ठरविण्यात आलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांच्या मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 
  • या अपात्रतेला या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिले आहे. त्यांच्या याचिकेवर १८ मार्चला सुनावणी होणार आहे.

तयारी तर केली, पण खानापूर आटपाडीची पोटनिवडणूक कधी?

  • खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचे ३१ जानेवारी २०२४ रोजी निधन झाल्याने ही जागाही रिक्त झाली आहे. 
  • या जागेची पोटनिवडणूकही लोकसभेसोबत होईल, अशी अपेक्षा होती. आयोगाने जिल्हा प्रशासनाला तयारीत राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 
  • पोट निवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही जिल्हा प्रशासनाने आणली आहेत. मात्र लोकसभेसोबत या जागेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने ती आता कधी होणार हा प्रश्न आहे.
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAkolaअकोलाElectionनिवडणूकVotingमतदान