शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठेच्या लढाईत अपक्ष उमेदवाराने दिला लालू आणि नितीश कुमारांना धक्का, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 16:27 IST

By Election Result 2024: बिहारमधील रुपौली विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अत्यंत चुरशीच्या झालेल्या रुपौली मतदारसंघातील पोटनिवडुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे.

आज सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये इंडिया आघाडीने आपला दबदबा राखल्याचं दिसत आहे. दरम्यान, बिहारमधील रुपौली विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अत्यंत चुरशीच्या झालेल्या रुपौली मतदारसंघातील पोटनिवडुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. रुपौलीमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने दिलेल्या उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी विजय मिळवला आहे. 

रुपौली विधानसभा मतदारसंघात लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीच्या उमेदवार बीमा भारती, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे उमेदवार कलाधर मंडल आणि अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांच्यात मुख्य लढत झाली होती. बीमा भारती यांनी जेडीयूमधून आरजेडीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीकडून लढणाऱ्या बीमा भारती यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आरजेडीने त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा संधी दिली. 

दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये जेडीयूचे कलाधर मंडल यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ते पिछाडीवर पडले. दरम्यान, येथून पाच वेळा आमदार राहिलेल्या बीमा भारती ह्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर होत्या. तसेच मतमोजणीच्या उत्तरार्धात त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. तर अपक्ष शंकर सिंह यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी टिकवताना जेडीयूच्या कलाधर मंडल यांचा ८ हजार २४६ मतांनी पराभव केला.  अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांना ६८ हजार ०७० मतं मिळाली. तर कलाधर मंडल यांना ५९ हजार ८२४ मतं मिळाली. बीमा भारती यांना  ३० हजार ६१९ मतांवर समाधान मानावं लागलं. 

दरम्यान, अपक्ष निवडून आलेले शंकर सिंह हे या भागातील बाहुबली नेते आहेत. शंकर सिंह आणि बीमा भारती यांचे पती अवधेश मंडल यांच्यात जुना वाद आहे. पूर्वी लोकजनशक्ती पक्षात असलेल्या शंकर सिंह यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तसेच त्यात ते विजयी देखील झाले.  

टॅग्स :BiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेडLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमार