शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:06 IST

ट्रम्प यांचे ‘मृत अर्थव्यवस्था’ वक्तव्य, टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांची अप्रत्यक्ष चपराक; म्हणाले, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर

वाराणसी : भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतःच्या आर्थिक हित, प्राधान्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादने वापरण्यावर अधिक भर द्यावा. भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच व्यापाऱ्यांनी दुकानात ठेवल्या पाहिजेत आणि आपण ग्राहकांनीही त्याच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी धरला. भारत हा मृत अर्थव्यवस्था असल्याचे सांगत भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क २५ टक्के करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाराणसी येथे एका कार्यक्रमात मोदी यांनी ट्रम्प यांना ही अप्रत्यक्ष चपराक लगावली.रशियाकडून लष्करी उपकरणे आणि खनिज तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताला दंडही आकारला आहे. या घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले की, जगातील अर्थव्यवस्था सध्या अस्थिर असून, अशा काळात अनेक देश फक्त आपल्या हितसंबंधांकडे लक्ष देत आहेत. भारतालाही आपल्या आर्थिक हिताबाबत सजग राहावे लागणार आहे. स्वदेशीचा कठोर पुरस्कार आणि सामूहिक प्रयत्नांतूनच आपण भारताला विकसित देश बनवू शकतो.

जगाने पाहिले भारताचे रौद्र स्वरूपऑपरेशन सिंदूरमुळे जगाला भारताची ताकद, त्याचे रौद्र रूप दिसले. आमच्या देशावर हल्ला करणारे पाताळात जरी दडून बसले, तरी त्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वाराणसीतील एका जाहीर सभेत म्हटले. त्यांनी सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची हत्या झाली. या घटनेने मी व्यथित झालो. आपल्या देशातील मायभगिनींच्या ‘सिंदूर’वर ज्यांनी हल्ला केला त्यांचा बदला घेण्याचे वचन मी महादेवाच्या कृपेने पूर्ण केले. ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवांच्या चरणी अर्पण करत आहे. १४० कोटी भारतीयांनी दाखविलेली एकजूट हेच या मोहिमेमागील खरे सामर्थ्य आहे. शिव म्हणजे कल्याण, पण जेव्हा वाईट गोष्टी, दहशतवाद डोके वर काढतो, तेव्हा महादेव रौद्र रूप धारण करतात. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे हेच रूप जगाने पाहिले.

समाजवादी पक्षाची संमती घ्यायची का ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पहलगाममधील हल्लेखोरांचा आताच का खात्मा केला, असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने संसदेत विचारला. दहशतवाद्यांवर हल्ला आता करायचा की नंतर, असे मी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना फोन करून विचारावे, अशी त्यांची अपेक्षा आहे का? असा सवाल मोदी यांनी केला.

स्वदेशी वस्तूच विकायचा निर्धार व्यापाऱ्यांनी करावा -पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर देशातील प्रत्येक पक्ष, नेता, नागरिकाने स्वदेशी वस्तूंचा वापर आणि प्रचार केला पाहिजे. आपल्या दुकानांमध्ये फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जातील, याकडे भारतातील व्यापारी, दुकानदारांनी लक्ष दिले पाहिजे. तिच देशाची खरी सेवा ठरणार आहे.  स्वदेशी गोष्टींविषयीचा आग्रह आपल्या प्रत्येक कृतीतून दिसला पाहिजे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारतbusinessव्यवसाय