शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता 4 तास आधीच जावं लागणार विमानतळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:57 IST

जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे.

नवी दिल्लीः जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले आहेत. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारनं दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. देशातल्या सर्वच विमानतळांवरची सुरक्षा वाढवण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांनीही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरो (BCAS)नं आपल्या विधानात म्हटलं आहे की, विमान कंपन्या आणि विमानतळावरील प्रशासनानंही घरगुती उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना 4 तास आधीच विमानतळावर येण्यास सांगण्यात आलं आहे. विमानतळावर येणारे ड्रोन मॉडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर नजर ठेवली जाणार आहे, यासाठी क्विक रिऍक्शन टीम तैनात करण्यात आली आहे. 30 ऑगस्टपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या दिवसानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचीही माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. हा नवा नियम 10 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.सामान्य स्वरूपात घरगुती प्रवाशांना उड्डाणाआधी दोन तास, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन तास आधीच विमानतळावर जावं लागणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर व्हिजिटर पास मिळणार नाही. व्हिजिटरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच विमानतळावर आता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच एखादी गाडी पार्किंगमध्ये उभी असल्यास तिचीही चौकशी होणार आहे.तसेच एअरपोर्ट टर्मिनलच्या बाहेरच पिकअप अँड ड्रॉपची सुविधा घ्यावी लागणार आहे. सर्वच प्रवाशांची विमानतळावर प्रवेश करण्यापासून विमानात बसेपर्यंत सखोल चौकशी होणार आहे. प्रवाशांशिवाय पायलट, क्रू मेंबर्ससह ग्राऊंड स्टाफसह विमानतळ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच यात कोण नशापान करतं हेसुद्धा पाहिलं जाणार आहे. सगळ्यांनाच या तपासणीच्या चक्रातून जावं लागणार आहे.