हुडकेश्वरमध्ये घरफोडी
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
नागपूर : हुडकेश्वरमध्ये एका घरातून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. आज सकाळी ९.१५ वाजता ही घटना उघडकीस घडली.
हुडकेश्वरमध्ये घरफोडी
नागपूर : हुडकेश्वरमध्ये एका घरातून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. आज सकाळी ९.१५ वाजता ही घटना उघडकीस घडली.जीवन विहार कॉलनी, रघुजीनगर येथे राहणाऱ्या रेखा संजय बुरडे (वय ३२) या शुक्रवारी सायंकाळी आपल्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या तर, त्यांचे पती एका कार्यक्रमात गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोख ३ हजार असा २ लाख, ५३ हजारांचा ऐवज चोरून नेला. आज सकाळी बुरडे घरी परतल्यानंतर घरफोडीची घटना उघडकीस आली. हुडकेश्वर पोलिसांनी घरफोडीची नोंद केली असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.------