निर्माणाधीन इमारत कोसळून १२ जण ठार
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
चंदौली : उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील दुल्हीपूर भागात शनिवारी रात्री एक निर्माणाधीन इमारत कोसळून १२ जण ठार आणि दोन जण जखमी झाली.
निर्माणाधीन इमारत कोसळून १२ जण ठार
चंदौली : उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील दुल्हीपूर भागात शनिवारी रात्री एक निर्माणाधीन इमारत कोसळून १२ जण ठार आणि दोन जण जखमी झाली. मृतांमध्ये पाच पुरुष, पाच महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. कमरुद्दीन याच्या घराचे बांधकाम सुरू असताना हा अपघात घडला. मृतांमध्ये चार जण बांधकाम करीत असलेले मजूर आहेत, असे पोलिसांनी सांगितले.इतारतीचा मलबा उपसण्याचे काम सुरू आहे. जखमी असलेल्या दोन्ही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३०,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान जारी केले आहे. (वृत्तसंस्था)