शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Budget Session: ...जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी आमने-सामने येतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 22:04 IST

Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिशनाचा आज शेवटचा दिवस होता, यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या.

नवी दिल्ली: 8 एप्रिल रोजी संपणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक दिवस आधी म्हणजेच 7 एप्रिल रोजी स्थगित करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. यादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा फोटो सर्वाधिक चर्चेत आला आहे. याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि सपाचे मुलायम सिंह यादव यांच्या फोटोंनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी भेटअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी तसेच जवळपास सर्व संसद सदस्य संसदेत उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सोनिया गांधी अभिवादन करुन खोलीत आल्या. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील उपस्थित होते. पीएम मोदी आणि सोनिया गांधी अशाप्रकारे एकमेकांना भेटले असतील असे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतात. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे समोर आले नाही.

अधिवेशनात काय झाले?संसदेच्या अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत चालला होता. त्यानंतर दुसरा टप्पा 14 मार्चपासून सुरू झाला आणि आज 7 एप्रिल रोजी संपला. आज लोकसभेत सभागृहाला संबोधित करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली की, 177 तास 50 मिनिटे चाललेल्या या अधिवेशनात 27 बैठका झाल्या.

ही विधेयके मंजूरया अधिवेशनात आर्थिक कायदेविषयक कामकाजाव्यतिरिक्त 12 सरकारी विधेयके पूर्ववत करण्यात आली आणि 13 विधेयके मंजूर करण्यात आली, असेही ते म्हणाले. यापैकी प्रमुख विधेयके होती - विनियोग विधेयक, 2022, वित्त विधेयक 2022, दिल्ली महानगरपालिका (दुरुस्ती) विधेयक 2022 आणि फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक, 2022. याशिवाय, सभागृहात 182 प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. अधिवेशनात सदस्यांनी 377 अन्वये 483 जनहिताचे विषय मांडले. तसेच, विविध संसदीय समित्यांनी एकूण 62 अहवाल सादर केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन