शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:46 IST

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे केंद्रातील विद्यमान सरकारचे हे शेवटचे असेल.

नवी दिल्ली : ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे केंद्रातील विद्यमान सरकारचे हे शेवटचे असेल. या अधिवेशनादरम्यान आजवरची संसदीय परंपरा मोडीत काढून लेखानुदानाऐवजी केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याचीचर्चा आहे. १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दरम्यान, राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मोदी सरकार या अधिवेशनादरम्यान पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तथापि, काँग्रेस-मित्रपक्षांसह इतर विरोधी पक्षांनी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या मनसुब्याला तीव्र विरोध करून सरकारला असे करण्यापासून रोखण्याची रणनीती ठरविली आहे. एवढेच नव्हेतर काँग्रेस अन्य पक्षांना सोबत घेऊन राष्टÑपतींकडेही दाद मागणार आहे.२०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केलेले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारचा कार्यकाळ जेमतेम तीन महिन्यांचा बाकी असताना लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेचे उल्लंघन करणारे आहे. तीन महिनेच कार्यकाळ बाकी असताना सरकार वर्षभरासाठी पूर्ण अर्थसंकल्प सादर कसे करू शकते, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.शेतकऱ्यांना दिलासा देणार...शेतकरी वर्गाची नाराजी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी दूर करण्याच्या आणि कृषी क्षेत्रावरील संकटाचे निवारण करण्याच्या इराद्यातहत केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच शेतकºयांसाठी विशेष आर्थिक योजना मंजूर करून दिलासा देऊ शकते. छोटे आणि सीमांत शेतकºयांच्या कमी उत्पन्नाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठीच्या उपाययोजनांसंबंधीचा कृषी मंत्रालयाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१९-२० च्या अर्थसंकल्पापूर्वी सरकार शेतकºयांसाठी आर्थिक योजनांची घोषणा करील, असे संकेत अलीकडेच कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी दिले होते.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय