शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ जानेवारीपासून?

By admin | Updated: September 16, 2016 01:19 IST

रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षाच्या प्रारंभी सर्व प्रकारचे संसदीय कामकाज पूर्ण करण्याच्या उद्देशाने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही एक महिन्याअगोदर म्हणजे २४ जानेवारीपासून बोलावण्याच्या संदर्भातही मंत्रिमंडळात विचारविमर्श केला जाईल.अर्थसंकल्पीय अधिवेशन अगोदरच बोलावण्यात आले तर हिवाळी अधिवेशनदेखील १२ नोव्हेंबरपासूनच आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. जीएसटीला तत्काळ मान्यता मिळाली या उद्देशाने हा बदल केला जाणार आहे. दरम्यान वित्त मंत्रालयाने अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामाची सुरुवात केली आहे. आतापर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडण्याची प्रथा चालत आली आहे. परंतु यावेळी हे दोन्ही अर्थसंकल्प विलीन करून एकत्रित सादर केले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. एरवी अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात आयोजित केले जाते आणि केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला सादर करण्यात येतो. त्यानंतर फेब्रुवारी आणि मे या दरम्यान दोन टप्प्यांमध्ये वैधानिक मंजुरी मिळविली जाते. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षाच्या प्रारंभी सर्व कर प्रस्तावांना तसेच योजनांवरील खर्चाला मंजुरी मिळण्याची प्रक्रियाही प्रारंभी व्हावी या हेतूने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ जानेवारीलाच बोलावण्यात येण्याची शक्यता आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणारे आर्थिक सर्वेक्षण ३० जानेवारीला आणि केंद्रीय अर्थसंकल्प ३१ जानेवारीला सादर केला जाऊ शकतो. असे झाले तर पुढच्या दोन महिन्यांत विनियोग विधेयक आणि वित्त विधेयकाला मंजुरी मिळविणे शक्य होईल, असे या सूत्रांनी सांगितले.(वृत्तसंस्था)