शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:53 IST

Budget Session 2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

नवी दिल्ली : संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

अधिसुचनेनुसार, १८ व्या लोकसभेचे चौथे अधिवेशन ३१ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल. तर सरकारी कामकाज ४ एप्रिल २०२५ रोजी संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन भाग असणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग ३१ जानेवारीला सुरू होईल आणि १३ फेब्रुवारीला संपणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग १० मार्चला पासून सुरू होईल आणि ४ एप्रिलला संपणार आहे.

३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात एकूण ९ बैठका होणार आहेत. यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतील. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील. यानंतर,संसदेचे कामकाज अर्थसंकल्पीय प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी सुरू होईल. त्यानंतर विविध मंत्रालयांकडून अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संसदेची दुसऱ्या भागात १० मार्चपासून पुन्हा बैठक होईल. 

३० जानेवारीला होणार सर्वपक्षीय बैठकसंपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ बैठका होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात सुरळीत चर्चा होण्यासाठी किरण रिजिजू यांनी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक चांगला आणि संतुलित अर्थसंकल्प सादर करतील, अशी आशा केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनParliamentसंसदDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन