शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, १ फेब्रुवारीला सादर होणार बजेट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:09 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार व विरोधक यांच्यात खटके उडतील.

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार व विरोधक यांच्यात खटके उडतील.अशीच एक बैठक सरकारतर्फेही बोलावण्यात आली आहे. त्यास विरोधी नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहतील. त्या बैठकीतही सरकारतर्फे मांडली जाणारी विधेयके आणि विरोधकांतर्फे मांडण्यात येणारे मुद्दे यांवर चर्चा अपेक्षित आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या काळातील आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारतर्फे आर्थिक आढावा सादर करण्यात येईल आणि १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. केंद्र सरकारचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असेल. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका अपेक्षित असून, त्यामुळे संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही.अधिवेशनाच्या दुसºया टप्प्यात म्हणजे ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात ‘ट्रिपल तलाक’चे व ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक मांडले जाणे अपेक्षित आहे. तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले, तरी राज्यसभेमध्ये ते विरोधकांनी रोखून धरले आहे. ते संसदेच्या चिकित्सा समितीकडे पाठवावे, असा विरोधकांचा आग्रह आहे, तसेच विरोधकांतर्फे विधेयकात काही नव्या दुरुस्त्याही सुचविल्या जातील, असे समजते.कोविंद यांचे पहिले अभिभाषणराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढे २९ जानेवारीला अभिभाषण होईल. राष्टÑपतींचे हे पहिलेच अभिभाषण असेल. त्यांच्या भाषणातून मोदी सरकारच्या नव्या योजनांची माहिती समजू शकेल.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनParliamentसंसद