शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

Budget: तंत्रज्ञान क्षेत्राला अप्रत्यक्ष फायदा देणाऱ्या तरतुदीच जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 07:45 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत पाहिजे तशी तरतूद झालेली नाही, असे मत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.

-अंकिता कोठारे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील यंदाचा तिसरा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी थेट कोणत्याही तरतुदी केलेल्या नाहीत. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अनेकदा चीन आणि अमेरिकासारखे देश पुढे असतात, याचे कारण मुख्य आहे की, शिक्षण आरोग्य आणि तंत्रज्ञानासाठी हे देश त्यांच्या जीडीपीच्या ५ टक्के खर्च करतात. त्यामुळे त्यांना तेवढे आर्थिक पाठबळ मिळते आणि तंत्रज्ञानात प्रगतीही झपाट्याने होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत पाहिजे तशी तरतूद झालेली नाही, असे मत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट 'एआय' संशोधन, विकास आणि नवोपक्रमाला चालना देणे आहे, ज्यामुळे भारताला जागतिक 'एआय' तंत्रज्ञान क्षेत्रात स्थान मिळेल. त्याचप्रमाणे भविष्यात एआयविषयीची तरतूद वाढली पाहिजे, जेणेकरून युवकांचे रोजगार हिरावून घेतले जाणार नाहीत. याचबरोबर सरकार उद्योग, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांना पाठिंबा देण्यासाठी प्रगत एआय हब स्थापन करण्याची योजना आखत असल्याचेदेखील या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः यात कॉम्प्युटर हार्डवेअर, एलईडी आणि एलसीडी यांवर असलेली कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली असून, या वस्तू स्वस्त होतील. लिथियम आयर्न हे मोबाइल फोन आणि कॉम्प्युटरसाठी बॅटरी तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली असल्याने मोबाइल आणि कॉम्प्युटर यांच्या किमती कमी झाल्याने उद्योगाला नक्कीच याची मदत होईल.

'उडान'मुळे विकेंद्रीकरणाला बळ

सध्या आयटी क्षेत्र देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे या शहरांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी 'उडान'सारख्या योजनेमुळे पाठबळ मिळणार आहे; कारण इतर शहरांमध्ये नवीन विमानतळे विकसित करण्यासाठी सरकारचा भर असणार आहे. त्यामुळे इतर शहरांमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ साकारले तर आंतरराष्ट्रीय केंद्रे सुरू होऊन त्या भागातील युवकांना रोजगार मिळेल. २०२५च्या अर्थसंकल्पात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामध्ये मेक इन इंडिया आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल.

तंत्रज्ञानासाठी पाहिजे तशी तरतूद केलेली नाही, असे स्पष्टपणे दिसत आहे. सध्या भारतात मोठमोठ्या कंपन्यांची जीसीसी सेंटर उभारली जात आहे. यंदा तरतूद केली असल्याने भारतात अशा कंपन्यांचा ओघ वाढला आहे. यामुळे रोजगार निर्मितीसाठी मदत होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रासाठी ५०० कोटी रुपयांनी तरतूद पुरेशी नाही. त्यामुळे यात अधिक काम होणे गरजेचे आहे. -अतुल कहाते, संगणक तज्ज्ञ

देशात पाच मोठे कौशल्य केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या योजनेमुळे आपल्या तरुणांना उद्योगाशी संबंधित विविध कौशल्यांचे धडे मिळू शकणार आहेत. याला तरुणांना लाभच होणार आहे. 'मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंग'ला पाठिंबा देण्यासाठी जागतिक भागीदारीसह ही केंद्रे स्थापन केली जाणार आहे. डिझाइन, प्रशिक्षण, कौशल्य आणि मूल्यांकन यांचा यात समावेश असेल. -डॉ. दीपक शिकारपूर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Budgetअर्थसंकल्प 2024technologyतंत्रज्ञानCentral Governmentकेंद्र सरकार