शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2023: विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प, पंतप्रधान मोदींचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 07:58 IST

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केले असून, विकसित भारताचा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली मजबूत पायाभरणी हा अर्थसंकल्प करेल, असे प्रतिपादन केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केले असून, विकसित भारताचा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली मजबूत पायाभरणी हा अर्थसंकल्प करेल, असे प्रतिपादन केले आहे.

संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओ संदेशात मोदी यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा आहे. हा अर्थसंकल्प आजचा महत्त्वाकांक्षी समाज, गाव, गरीब, शेतकरी, मध्यम वर्ग अशा सर्वांचे स्वप्न साकार करील. विकसित भारताच्या निर्मितीस गती देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल वित्तमंत्री सीतारामन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.

अर्थसंकल्पातील विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, मेहनत व सृजन करणाऱ्या समुदायासाठी अर्थसंकल्पात पहिल्यांदाच अशी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल.

जीवनशैली बदलणारn मोदी यांनी म्हटले की, गावापासून शहरापर्यंतच्या सर्व महिलांच्या जीवनशैलीत बदल घडविण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. n महिलांच्या स्वयंसहायता समूहांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विशेष तरतुदीमुळे त्यांना नवी दिशा मिळेल.n मोदी यांनी म्हटले की, सरकारने सहकार क्षेत्रासाठी जगातील सर्वांत मोठी अन्नसाठा योजना बनविली आहे. शेतीबरोबरच दूध व मासळी उत्पादन वाढविण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. यातून शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांना उत्पादनाचा अधिक चांगला परतावा मिळण्यास मदत होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2023