शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढणार? मध्यम वर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी, कोणाला मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:57 IST

Ayushman Bharat Scheme: सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत.

देशातील ५५ कोटी गरीबांसाठी सुरु करण्यात आलेली आयुष्मान भारत योजनेचा लाभ लवकरच मध्यमवर्गाला देखील मिळण्याची शक्यता आहे. सरकारने याची तयारी सुरु केली आहे. उद्या अर्थसंकल्पात यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयुष्मान योजनेतून १०.७४ कोटी कुटुंबांना आरोग्य सुविधा, मोफत कॅशलेस उपचाराची सेवा देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. मध्यमवर्गाला देखील आयुष्मान भारतमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, यावर काही महिन्यांपूर्वीच विचारविमर्श सुरु झाला होता. मध्यमवर्गाला या योजनेत आणण्यासाठी अनेक प्रकारच्या पर्यायांवर विचार केला जात आहे. 

कोणाला मिळणार लाभ...यामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा, संगठीत, असंगठीत क्षेत्रातील कर्मचारी असे पर्याय असू शकतात. मध्यमवर्गामध्ये खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्या कर्माचाऱ्यांना आयुष्मान भारतमध्ये रजिस्टर करण्यासाठी खासगी कंपन्यांना अधिकार दिले जाऊ शकतात. असे झाल्यास १५००० रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना ईएसआयसी आणि त्यापेक्षा वरील २५ ते ३० हजार पगार असलेल्यांना आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य उपचार मिळू शकतात. 

प्रिमिअम भरावा लागणारखासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देतात. काही कंपन्या यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसेही घेतात. आयुष्मानसाठी यापेक्षा कमी प्रमिअम या कंपन्यांना द्यावा लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कर्माचाऱ्यांना थेट आयुष्मान योजनेचा लाभ घेण्याचा देखील पर्याय मिळू शकते. नुकतेच गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने केंद्रीय निमलष्करी दलांना आयुष्मान भारत योजनेशी जोडण्यात आले आहे आणि तेथे कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहे. मध्यमवर्गीयांना आयुष्मान भारतशी जोडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

का दिले जाणार...सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. कोरोनामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा भार पडल्यानंतर, सरकार आता लाभार्थी शोधण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर आयुष्मान कार्ड देण्याची मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतBudgetअर्थसंकल्प