शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

Budget 2021 live : विमा क्षेत्रातील FDI ४९ टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांवर; निर्मला सीतारामन यांची घोषणा

By जयदीप दाभोळकर | Updated: February 1, 2021 12:34 IST

Budget 2021 live : येत्या वर्षांत LIC चा आयपीओ येणार, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार - अर्थमंत्री

ठळक मुद्देयेत्या वर्षांत LIC चा आयपीओ येणाररकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार - अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक वाढवणार असल्याची घोषणा केली. सध्या विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता आहे. परंतु आता ती वाढवून ७४ टक्के करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. " विमा कायदा १९३८ मध्ये बदल करण्यात आले आहेत. विमा क्षेत्रात आता ७४ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणूक करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ४९ टक्के इतकी होती. याव्यतिरिक्त गुंतवणुकदारांना चार्टर तयार करण्यास सांगण्यात आलं आहे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. यावेळी अर्थमंत्र्यांनी काही स्टार्टअप कंपन्यांसाठी घोषणा केली. या अंतर्गत जवळपास एक टक्के कंपन्यांना कोणत्याही अडचणींशिवाय सुरूवातीला काम करण्याची मंजुरी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना महासाथीचं संकट असलं तरी आम्ही रणनितीक निर्गुंतवणुकीवर काम करत आहोत. बीपीसीएल, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड सारख्या कंपन्यांमधील निर्गुंतवणूक २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. निर्गुंतवणुकीसाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. अनेक कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार आहे. २०२२ या आर्थिक वर्षांत १.७६ लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. याच आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओदेखील आणण्यात येईल. याव्यतिरिक्त IDBI मध्येही निर्गुंतवणूक केली जाईल. बीपीसीएल, एअर इंडिया, आयडीबीआय, एससीआय आणि कॉनकोरमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया २०२१-२२ याआर्थिक वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.वीज क्षेत्रासाठी मोठी घोषणाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वीज क्षेत्रासाठीही मोठी घोषणा केली. या क्षेत्रासाठी सरकारडून ३ लाख कोटींची स्कीम लाँच केली जाणार आहे. याअंतर्गत देशातील वीज क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारकडून हायड्रोजन प्लांट तयार करण्याचीही घोषणा करण्यात आली. वीज क्षेत्रात PPP मॉडेल अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण केले जाणार असल्याचंही सीतारामन म्हणाल्या. भारतात मर्चंट शिप्सना चालना देण्यासाठीही काम केलं जाणआर आहे. सुरूवातीला यासाठी १६२४ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त गुजरातमध्ये सध्याच्या प्रकल्पात शिप रिसायकल करण्यावरही काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021LIC - Life Insurance CorporationएलआयसीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनFDIपरकीय गुंतवणूकelectricityवीज